vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वैचारिक दिवाळखोरीकडे चाललेली पिढी समाजासाठी मोठे संकट : मंगल खिवंसरा

वैचारिक दिवाळखोरीकडे चाललेली पिढी समाजासाठी मोठे संकट : मंगल खिवंसरा

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी“वैचारिक दिवाळखोरीकडे चाललेली आजची पिढी समाजासाठी मोठे संकट ठरत असून चिकित्सा, संवाद आणि सामाजिक जाणिवा जपणारी विचार परंपरा टिकवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांनी केले. त्या स्थानिक जिजाऊ मंदिर, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे १२ वे रमाई महिला चळवळीचे साहित्य संमेलन, पुणे–२०२६ च्या अध्यक्षपदी प्रा. प्रतिमा परदेशी यांची निवड झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमातून बोलत होत्या. यावेळी पिछडा ओबीसी संघटनेचे सुदाम चिंचाणे तसेच आंबेडकरी साहित्यिक भीमराव सरवदे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. प्रतिमा परदेशी यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रा. परदेशी यांनी परिवर्तनवादी साहित्याची परंपरा जपण्याचा निर्धार व्यक्त केला. “महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित साहित्य चळवळ समाजाला दिशा देणारी आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी सुदाम चिंचाणे यांनी मागासवर्गीय समाजातील प्रश्नांवर भाष्य केले, तर भीमराव सरवदे यांनी आंबेडकरी साहित्य चळवळीचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले.

यावेळी कांचन गादीकर, डॉ. सुनिता शिंदे, अॅड. वैशाली कडू, ललिता खडसे, जयश्री सरोदे, सविता अभ्यंकर, मंगल मून, तिलोत्तमा झाडे, अनिता दैवतकर, मोनिसा खान

प्रास्ताविक प्रा.डॉ. रेखा मेश्राम यांनी केले, सूत्रसंचालन अॅड. वैशाली डोळस, आभार प्रा. भारत शिरसाट यांनी केले. महिला वर्कशॉप मध्ये …. महिलांनी सहभाग नोंदविला. तसेच मराठा सेवा संघ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ व इतर उपस्थितांकडून प्रतिमा परदेशी यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट,चिकित्सा नाकारणाऱ्या संस्कृतीविरोधात रमाई साहित्य संमेलनाचा एल्गार ; प्रा. प्रतिमा परदेशी“साहित्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. स्त्री, बहुजन, श्रमिक आणि वंचित समाजाच्या वेदना मांडणारे साहित्यच समाजाला नवी दिशा देऊ शकते. परिवर्तनवादी विचारांना रोखण्याचा प्रयत्न होत असतानाच चिकित्सा नाकारणाऱ्या संस्कृतीविरोधात रमाई साहित्य संमेलनाने एल्गार पुकारला आहे.

 00000

संबंधित पोस्ट

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास शासनाचे प्रथम प्राधान्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • महिलांच्या शाश्वत उपजीविकेसाठी ‘उमेद–एमएसआरएलएम’ व ‘राह फाउंडेशन’चा सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

मराठी ही केवळ संवादाची नव्हे, तर रोजगाराची भाषा व्हावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा येथे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

vishwatmaklokswamivarta

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित

vishwatmaklokswamivarta

राज्य सरकार लॉटरी व्यवसाय बंद करून गोरगरीब लॉटरी विक्रेत्यांच्या पोटावर पाय दिला तर मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करून सरकारचा निषेध करणार असल्याचा इशारा राज्यातील लॉटरी विक्रेता कर्मचारी सेने चे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी दिला

vishwatmaklokswamivarta

मातीच्या पणत्यांतून उजळतेय भविष्याचे आकाश;बालगृहातील मुलांना मिळाला नवा आत्मविश्वास!- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची संकल्पना- बालगृहातील मुलांना कौशल्य विकासाचे धडे – 10 ऑक्टोबरपर्यंत चालणार कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ७५ हजार विद्यार्थी एका सुरात गाणार गीत…

vishwatmaklokswamivarta