vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्कØ वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्कØ वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

 

गडचिरोली, प्रतिनिधी : वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक 18 जून 2026 रोजी होणार आहे. यासाठी तिनही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. तिनही जिल्ह्यात 18 मे पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून या आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत आयेाजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपस्थित होते.

सदर निवडणुकीकरीता चंद्रपूर महानगरपालिकेचे 66 सदस्य तसेच जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 7 नगर पंचायतीचे एकूण 403 असे चंद्रपूर जिल्ह्यातील 469 मतदार, गडचिरोली जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि 9 नगर पंचायतींचे एकूण 244 मतदार तर वर्धा जिल्ह्यातील 10 नगर‍ परिषदांचे एकूण 264 मतदार आहेत. तर चंद्रपूर, गडचिरेाली आणि वर्धा येथील जिल्हा परिषदांच्या सदस्यांची संख्या शुन्य आहे.

वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीकरीता प्रत्येक जिल्ह्यातील उपविभागाच्या मुख्यालयी एक याप्रमाणे 17 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी चंद्रपूर जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे. या निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षक यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर वसुमना पंत यांनी सांगितले.

०००००

 

Maharashtra DGIPR CMOMaharashtra #Gadchiroli

संबंधित पोस्ट

राज्यातील काही भागांमध्ये १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह #पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता

महिला सक्षमीकरणाबाबतीत कोणतीही तडजोड नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य महिला आयोगाच्या ‘सक्षमा’ कार्यक्रमाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

बातमी संदर्भात माहिती घेत असतांना गुत्तेदाराची शिवीगाळ, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

vishwatmaklokswamivarta

जालना शहर महानगरपालिका मार्फत जालना शहरातील दिनांक 07 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी अकरा वाजेपर्यंत सार्वजनिक श्री गणेश मंडळाच्या 290 गणेश मूर्तींचे महापालिकेमार्फत श्री छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंड येथे विसर्जन

vishwatmaklokswamivarta

नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी जागा निश्चित करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

पाणी फाउंडेशन फार्मर कप २०२६ साठी जिल्हा सज्ज; शेतकऱ्यांनी हिरीरीने सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील