vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी भूजल पुनर्भरण हाच प्रभावी पर्याय – मंत्री गुलाबराव पाटील

शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी भूजल पुनर्भरण हाच प्रभावी पर्याय – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात शाश्वत पाणी उपलब्धतेसाठी भूजल पुनर्भरण हा एकमेव प्रभावी पर्याय असून मोठ्या प्रमाणावर पुनर्भरणाच्या उपाययोजना राबविणे काळाची गरज असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. भूजल पुनर्भरणाच्या कामांसाठी नियमित आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन विभागामार्फत शासन निर्णय काढण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच डीपीडीसी (जिल्हा नियोजन समिती) निधी आणि मायनिंग विभागाच्या निधीचा वापर या कामांसाठी करण्यात यावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

मंत्रालयात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे भूजल पुनर्भरणाची कामे करण्यासाठी नियमित निधी उपलब्ध करून देणे तसेच त्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस प्रधान सचिव पराग जैन यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जलधरांमध्ये प्रभावी आणि मोठ्या प्रमाणावर भूजल पुनर्भरण होण्यासाठी थेट भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना राबविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपाययोजनांमध्ये प्रामुख्याने रिचार्ज शाफ्ट, रिचार्ज शाफ्टसह रिचार्ज ट्रेंच, छतावरील पावसाचे पाणी संकलन व पुनर्भरण यांसारख्या उपायांचा समावेश आहे.

या उपाययोजनांमुळे पावसाचे नदी-नाल्यांतून वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवून अधिक प्रभावीपणे भूजल पुनर्भरण करता येते. विविध योजनांअंतर्गत अशा उपाययोजना यापूर्वी राबविण्यात आल्या असून त्यामुळे जलस्रोत बळकटीकरणासह भूजल पातळी वाढविण्यास मोठा फायदा होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील भूजल पातळी स्थिर करणे व वाढविणे, अतिशय शोषित व अंशतः शोषित क्षेत्रांची संख्या कमी करणे, टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची संख्या टप्प्याटप्प्याने घटविणे तसेच पाणीपुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरण करून पाण्याची शाश्वतता वाढविणे हे या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

 

०००००

संबंधित पोस्ट

कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण  करणाऱ्याअंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात”सेवा पंधरवाडा” सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविणार – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार

कायद्याची जाण निर्माण करण्यासाठी,सामाजिक न्यायासाठी महाशिबिर उपयुक्त ठरेल- न्यायमूर्ती भारती डांगरे ,इस्लामपूरमध्ये विधी साक्षरता, शासकीय योजनांचे महाशिबिर उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta