vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

 

        सांगली, प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) यांचा अंतरिम (तात्पूरता) निकाल 18 मे 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला असून शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

            विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमधून दि. 18 ते 27 मे 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी 50 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.

            विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव किंवा आईचे नाव यामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास दि. 27 मे 2026 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारला जाणार नाही. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून हे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर दि. 27 मे 2026 रोजी पर्यंत पाठविण्यात यावे.

            विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. विहित मुदतीत ऑनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)ही-मॅन’ची एक्झिट चटका लावणारी, चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जपानची कार्य संस्कृती जगात सर्वोत्तम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

बिहारच्या मतदार यादीत 18 लाख मृत, 26 लाख स्थलांतरित व 7 लाख दुहेरी नोंदणी असलेले मतदार..

टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणीकापूस व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी

समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद

vishwatmaklokswamivarta

स्वच्छतेप्रमाणेच नवी मुंबईला चढतोय सुंदरतेचा साज..