vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणीकापूस व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी

टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणीकापूस व्यापार करणाऱ्या कंपनीची चौकशी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- येथील आयकर कार्यालय, टीडीएस मार्फत टीडीएस तरतुदीचे पालन न केल्याप्रकरणी एका कापसाचा व्यापार करणाऱ्या कंपनीची दि.७ रोजी चौकशी केली. या कंपनीने २० कोटी रुपयांच्या दिलेल्या व्याजावर कोणताही कर कपात केला नाही तसेच अन्य व्यवहारांमध्ये कापलेले ७१ ल्काह रुपयांचे टीडीएस सरकार खात्यात जमा केले नाही,असा आरोप आहे, अशी माहिती आयकर अधिकारी (टीडीएस) राहुल मोरे यांनी दिली आहे.

 येथील कापसाचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात सर्वे करुन दिवसभर विविध कागदपत्रांची तपासणी केली. त्यात कंपनीने दिलेल्या व्याजावर लागू असलेला दहा टक्के टीडीएस कापला नाही आणि इतर व्यवहारांवर कापलेल्या टीडीएस केंद्र सरकारच्या खात्यात जमा केला नाही, या कारणास्तव आयकर विभागाच्या टीडीएस अधिकाऱ्यांनी कंपनीची सखोल चौकशी केली. आयकर कायदा १९६१ च्या कलम १९ ए च्या तरतुदीनुसार, कोणत्याही कंपनीसाठी व्याज देताना दहा टक्के टीडीएस कापणे बंधनकारक आहे. तथापि, कंपनीने सुमारे वीस कोटी रुपयांच्या दिलेल्या व्याजावर कोणताही कर कापला नाही. शिवाय, कंपनीने इतर व्यवहारांवर कापलेले सुमारे ७१ लाख रुपयांचे टीडीएस सरकारी खात्यात जमा केले नाही,असाही आरोप आहे.तपासणी दरम्यान व्याजासह ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.

संबंधित सर्वांनी आयकर कायदा,१९६१ च्या सर्व टीडीएस तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन आयकर विभागाने केले आहे. 00000

संबंधित पोस्ट

पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची घेतली शपथ

लोकसहभागातून गावांचा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-२०२६’ चे वितरण

गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी

मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश! मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सरकारने खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा- हवामान विभागाचा अंदाज

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात २२ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी