vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश! मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सरकारने खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत

 मराठा नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे यश,मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सरकारने खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत

मुंबई प्रतिनिधी

 मुंबईतमागील पाच दिवसापासून आझाद मैदानात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेले मनोज रंगे पाटील आणि यांच्या लाखो समर्थकांना आज यश मिळालेले आहे राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत आणि त्यांनी आज उपोषण सोडले आहे आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस म्हणून इतिहासात नोंद घेतला जाईल असे अनेक समर्थकांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाल्याचे दिसून आलेले आहे

आज राज्य सरकारने,मराठा समाजाच्या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सरकारने खालील महत्त्वाचे निर्देश दिले आहेत –

१ मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि रोजगार देण्याची प्रक्रिया तात्काळ केली जाईल.

२ आंदोलकांवर दाखल केलेले फौजदारी गुन्हे सप्टेंबर २०२५ अखेर मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी.

३ सर्व ग्रामपंचायतींचे ५८ लाख रेकॉर्ड/नोंदणी नोटीस बोर्डवर प्रकाशित करण्याचे निर्देश.

४ जात प्रमाणपत्र तपासणी प्रक्रिया.

अर्ज सादर केल्यापासून ९० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश.

५ न्यायाधीश संदीप शिंदे (निवृत्त) समितीचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवला, समिती रेकॉर्ड शोधत राहील.सरकारने संबंधित विभागांना ही सर्व कार्यवाही पूर्ण करून अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित पोस्ट

६३९७८ विद्यार्थी इ.१२ वी तर ६८२२३ देणार इ.१० वी ची परीक्षा-परीक्षा कॉपीमुक्त व तणावमुक्त व्हाव्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येकडे लक्ष देत सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना महत्त्वाचा आदेश,सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या भटक्या श्वानांना तात्काळ हटवून त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करण्याचे निर्देश…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार, पहिल्या टप्प्यामध्ये १० मॉल उभारणार पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जादूटोणा व अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी -अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ,विज्ञान युगातही अंधश्रद्धेचा विळखा जनतेला फसवल्यास सात वर्षापर्यंत शिक्षा…

दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अजित दादांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथयात्रेनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.