vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

डाक विभागाच्या आउटलेटसाठी प्रस्ताव मागविले

डाक विभागाच्या आउटलेटसाठी प्रस्ताव मागविले

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी-भारतीय डाक विभागाकडून खासगी व्यक्तींना फ्रँचायझी आउटलेट चालविण्याची उत्कृष्ट व्यवसाय संधी देण्यात येणार असून त्यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.       या योजनेअंतर्गत फ्रँचायझीधारकांना सर्व प्रकारच्या डाक वस्तूंचे बुकिंग करण्याचा अधिकार देण्यात येईल. यासाठी दैनिक व मासिक स्वरुपात आकर्षक कमिशन मिळणार आहे. कमी गुंतवणुकीत आणि शासकीय पाठबळासह हा व्यवसाय स्थिर व विश्वासार्ह उत्पन्नाचा स्त्रोत ठरु शकतो.

या फ्रँचायझी योजनेचे फायदे:· विश्वसनीय व प्रतिष्ठित शासकिय संस्थेशी संलग्नता· आकर्षक कमिशन रचना· डाक सेवांची वाढीची संधी· डाक विभागाकडून आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य या उपक्रमाचा उद्देश डाक सेवांचा विस्तार करणे, नागरिकांना अधिक सोयीस्कर सेवा उपलब्ध करुन देणे हा आहे.

इच्छुक कुरिअर सेवा पुरवठादार व व्यक्तींनी आपले अर्ज प्रवर डाक अधीक्षक छत्रपती संभाजीनगर टपाल विभाग, छत्रपती संभाजीनगर येथे पाठवावे, अधिक माहितीसाठी 0240-2970610 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000

संबंधित पोस्ट

हिरकणी कक्ष, दामिनी पथकासाठी ई-बाईक्सचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन जाहीर.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहिम;श्रमदानातून झाला परिसर स्वच्छ

जालना-नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांच्या समृध्दी महामार्गाच्या समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

दहावी-बारावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा सवलतीचे गुण प्रस्ताव ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समित्यांनी समन्वय ठेवावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला सर्व समित्यांचा सविस्तर आढावा…

vishwatmaklokswamivarta