vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सन 2026-27 मधील नमुंमपा क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

सन 2026-27 मधील नमुंमपा क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

     नवी मुंबई प्रतिनिधी     नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दि. 31 मार्च 2026 अखेर खालील प्राथमिक शाळा शासनाची / नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही.

          तथापि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 5 शाळा विनामान्यता चालविण्यात येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.

संस्थेचे नांव :- इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई

शाळेचे नांव व पत्ता :- अल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज, सेक्टर-8 ब, सी.बी.डी. बेलापूर.

माध्यम :- इंग्रजी

शेरा :- न्यायप्रविष्ट बाब (रीट – याचिका क्र. 6565/2023)

अ.क्र. 2

संस्थेचे नांव :- ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, अग्रीपाडा, मुंबई

शाळेचे नांव व पत्ता :- इकरा इंटरनॅशनल ॲण्ड मक्तब स्कुल, सेक्टर-27, नेरूळ

माध्यम :- इंग्रजी

अ.क्र. 3

संस्थेचे नांव :- एक्सलेंस चेरिटेबल ट्रस्ट खैरणे गाव, सेक्टर-१२ डी, कोपरखैरणे, नवी मुंबई.

शाळेचे नांव व पत्ता :- अॅग्नल प्रि-प्रायमरी कॉनव्हेन्ट स्कूल हाऊस नं-296 सेक्टर 12 डी, खैरणेगाव, नवी मुंबई

 

माध्यम :- इंग्रजी

 

अ.क्र. 4

 

संस्थेचे नांव :- गुरुदास सेवा समिती, घणसोली, नवी मुंबई.

शाळेचे नांव व पत्ता :- विश्वभारती स्कुल, प्लॉट नं. 1 से.2 कोपरखैरणे, नवी मुंबई.

माध्यम :- इंग्रजी

शेरा :- (इयत्ता 1 ली ते 5वी पर्यंतच्या वर्गाला मान्यताप्राप्त आहे. 6 वी ते 8 वी चे वर्ग अनधिकृत आहेत.)

अ.क्र. 5

संस्थेचे नांव :- किंगडम वेलफेअर चॅरिटी अॅन्ड कॉनव्हेन्ट, वाशी, सेक्टर-17, सी-8, वाशी, नवी मुंबई.

शाळेचे नांव व पत्ता :- चिरिस्ट द किंग सेकंडरी स्कुल, कोपरखैरणे, प्लॉट नं-66, डि-मार्ट जवळ, कोपरखैरणे, सेक्टर-15, नवी मुंबई

माध्यम :- इंग्रजी

शेरा :- (इयत्ता 1 ली ते 7वी पर्यतचे वर्गाला मान्यता प्राप्त आहे. आणि आठवी चा वर्ग अनधिकृत आहेत.)

          तरी संबंधित पाचही शाळा व्यवस्थापकांनी पालकांशी संपर्क साधून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिक असलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा बंद करावी.

          तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन करण्यात येत आहे. ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजीकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असेही आवाहन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.00000

संबंधित पोस्ट

भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४२ हजार २९४ किलो साठा जप्त;अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्टपासूनची कारवाई

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्लोव्हाकियाच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित, पंतप्रधानांनी हा पुरस्कार केला देशवासियांना समर्पित.

आताची मोठी बातमी- | मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांसाठी सूचना 🚆🌧️मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील Tunnel No. 40 (BB EMD) येथे दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.मुसळधार पावसामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्या वळविण्यात आल्या आहेत.

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर :मुंबईतील सर्व होर्डिंगचे तीन महिन्यात ऑडिट पूर्ण करणार- मंत्री उदय सामंत

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta