vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सातारा जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांमध्ये बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी

सातारा जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांमध्ये बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी

सातारा प्रतिनिधी : जिल्हा कौशल्य विकास रोजगार, व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व सक्षम फाऊंडेशन फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्हातील उत्पादन क्षेत्रातील आस्थापनांमधील रिक्तपदे भरण्यासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा २६ मे रोजी डॉ.बी.आर. आंबेडकर आय.आय.टी. ए ब्लॉक, मोनिता गार्डन, लक्ष्मीनगर, फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा.

कुशल/अर्धकुशल सदर मेळाव्यात १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर, रिक्तपदे कामगार अशा प्रकारचे १०० पेक्षा जास्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक २६ मे रोजी डॉ. बी. आर. आंबेडकर आयआयटी ए ब्लॉक मोनिता गार्डन लक्ष्मीनगर फलटण येथे आपली शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत तसेच प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत मार्गदर्शन केले जाईल, असेही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी कळविले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

24 मार्चला जालना येथे उद्योजक मेळाव्याचे आयोजन• नवउद्योजकांना मिळणार मार्गदर्शन

अमृतचे पाच दिवसीय कर्मचारी प्रशिक्षण शिबीर संपन्न 

व्यायाम साहित्य व क्रीडा साहित्याकरिता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

रेल्वे स्टेशन वरील चहा विक्रेत्यांवर वैधमापन शास्त्र विभागाची कारवाई

लातूर येथे १५ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बँकिंग व फायनान्स क्षेत्रात नोकरीची संधी