vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्ह्यात 25 मे अखेर 65 टँकरद्वारे पाणीपुरवठा64 गावे व 230 वाड्यांतील 1 लाख 13 हजार 701 नागरिकांना दिलासा

रायगड जिल्ह्यात 25 मे अखेर 65 टँकरद्वारे पाणीपुरवठा64 गावे व 230 वाड्यांतील 1 लाख 13 हजार 701 नागरिकांना दिलासा

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी :- जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दि.25 मे 2026 अखेर जिल्ह्यात एकूण 65 टँकर कार्यरत असून त्याद्वारे 64 गावे व 230 वाड्यांमधील 1 लाख 13 हजार 701 नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्व टँकर खासगी स्वरूपातील असून शासकीय टँकर अथवा मदतीचे टँकर कार्यरत नाहीत. सर्वाधिक टंचाईग्रस्त परिस्थिती पेण तालुक्यात असून येथे 9 गावे व 76 वाड्यांसाठी 12 टँकर कार्यरत आहेत. या माध्यमातून 24 हजार 746 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

महाड तालुक्यात 14 गावे व 87 वाड्यांसाठी 9 टँकरद्वारे 22 हजार 243 नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. पनवेल तालुक्यात 10 गावे व 8 वाड्यांसाठी 9 टँकरद्वारे 18 हजार 553 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. कर्जत तालुक्यात 3 गावे व 11 वाड्यांसाठी 8 टँकर, खालापूर तालुक्यात 5 गावे व 9 वाड्यांसाठी 6 टँकर, तर माणगाव तालुक्यात 4 गावे व 15 वाड्यांसाठी 5 टँकर कार्यरत आहेत.याशिवाय अलिबाग तालुक्यात 4 गावे, उरण तालुक्यात 4 वाड्या, सुधागड-पाली तालुक्यात 2 वाड्या, रोहा तालुक्यात 3 गावे, पोलादपूर तालुक्यात 5 गावे व 14 वाड्या, म्हसळा तालुक्यात 6 गावे व 1 वाडी, तसेच श्रीवर्धन तालुक्यात 1 गाव व 3 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडून पाणीटंचाईग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त टँकर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

जातीय विषमते विरोधात लढणारे पत्रकार भाई छोटू कांबळे यांचा सत्कार

विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतानाच मैदानी खेळांनाही प्राधान्य द्यावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा· शाळा प्रवेशोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागत

भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी

vishwatmaklokswamivarta

२३ मतमोजणी कक्षात उद्या सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार – महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६

vishwatmaklokswamivarta

वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियाआषाढी वारी नियोजनाबाबत आढावा बैठक संपन्न