vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी*जिल्हा प्रशासनाचे आवाहन

            अमरावती, प्रतिनिधी : किसान सन्मान निधीचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना येत्या कालावधीत मिळणार आहे. हा लाभ शेतकऱ्यांना तातडीने मिळावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी त्वरीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत सुरळीत पोहोचवण्यासाठी आणि भविष्यातील सर्व योजनांसाठी पात्र होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकची नोंदणी त्वरीत पूर्ण करावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी आपला गाव नमुना, सातबारा उतारा व आधार कार्डसह आपले सरकार सेवा केंद्रावर जावून नोंदणी करून ‘फार्मर आयडी’ प्राप्त करून घ्यावा.

 जिल्ह्यात अचलपूर 7 हजार 721, अमरावती 14 हजार 479, अंजनगाव सुर्जी 5 हजार 411, भातकुली 7 हजार 208, चांदूर रेल्वे 4 हजार 164, चांदूरबाजार 8 हजार 334, चिखलदरा 1 हजार 559, दर्यापूर 9 हजार 408, धामणगाव रेल्वे 5 हजार 821, मोर्शी 9 हजार 176, नांदगाव खंडेश्वर 8 हजार 893, तिवसा 6 हजार 472, वरूड 8 हजार 749 खातेदार ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्यापासून शिल्लक आहेत. मात्र धारणी तालुक्यात अधिकचे 731 खातेदार नोंदणी झाली आहे.

     जिल्ह्यात एकूण 5 लाख 16 हजार 195 खातेदार असून आतापर्यंत 4 लाख 22 हजार 649 खातेदारांची नोंदणी झाली आहे. अद्यापही 93 हजार 546 खातेदारांची नोंदणी शिल्लक आहे. त्यामुळे ॲग्रीस्टॅक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून सर्व शेतकऱ्यांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी पात्र व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

अपघातग्रस्तांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत – रोहयो मंत्री भरत गोगावले

vishwatmaklokswamivarta

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार सुरुच, तब्बल 10 ठिकाणी आभाळ फाटल्याने शेकडो घरी वाहून गेली; 5 जणांचा मृत्यू, 11 जणांचा शोध सुरुच, 100 गावांमध्ये बत्ती गुल…

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीतील बंगाली बांधवांना मिळणार जमिनीचा मालकी हक्क – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ४० हजार बंगाली नागरिकांना मोठा दिलासा

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हाहाकार! 🌧️ हवामान विभागानं मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी केला राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत ….

vishwatmaklokswamivarta

महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य*