vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कृषी निविष्ठा संनियंत्रण समिती बैठक,शेतकऱ्यांना बियाणे,खते वेळेत उपलब्ध करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

कृषी निविष्ठा संनियंत्रण समिती बैठक,शेतकऱ्यांना बियाणे,खते वेळेत उपलब्ध करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी खरीप हंगामाच्या दृष्टीने आवश्यक कृषी निविष्ठा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. पेरणीच्या वेळापत्रकाप्रमाणे त्या शेतकऱ्यांपर्यंत सुव्यवस्थित नियोजन करुन पोहोचवा,असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक आज जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, सर्व तालुका कृषी अधिकारी, कृषी निविष्ठा उत्पादक, विक्रेते, वितरक, वाहतुकदार आदी बैठकीस उपस्थित होते.

खतांच्या मागणीसाठी पथदर्शी प्रकल्प,सहसंचालक वानखेडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना खतांची मागणी मोबाईलवरुन नोंदवून घरपोच खते देण्याबाबत पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी कृषी सेवा केंद्रांनी आपले आयडी तयार करावे. आयएफएमएस असे या पोर्टल/ ॲपचे नाव असून याद्वारे शेतकरी मोबाईलद्वारे आपली मागणी नोंदवू शकतील,असे त्यांनी सांगितले. हा प्रथदर्शी प्रकल्प आपल्या जिल्ह्यात राबवावयाचा असून त्यासाठी निविष्ठा विक्रेत्यांनी आपले आयटी तयार करावे,असे त्यांनी सांगितले.

जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी सादरीकरण करुन नियोजन सादर केले. त्यांनी माहिती दिली की, जिल्ह्यात ३ लाख ४५ हजार ८०६७ हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरणीचे नियोजन असून त्यासाठी ३१ हजार ३२ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. सर्वाधिक नियोजीत क्षेत्र कपाशी लागवडीचे असून त्यासाठी ७७११ क्विंटल (१७ लाख १३ हजार पाकिटे) बियाणे आवश्यक आहे.

पिकनिहाय प्रस्तावित पेरणीक्षेत्र,कापूस-३०८४५४ हे., मका-२६५६३० हे., तूर-५४८०३ हे., सोयाबीन- ३४२१७ हे., मुग- १२१६७ हे., बाजरी- ९०६८ हे., भुईमुग- ८१९९ हे., उडीद-३८६६ हे, खरीप ज्वारी- ७३ हे.,तीळ-१३९ हे, इतर पिके-४७१ हे. असे एकूण ६ लाख ९७ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पिकनिहाय पेरणी प्रस्तावित आहे.

बियाणे मागणी,  पिकनिहाय बियाणे मागणी याप्रमाणे- मका- ३९८४५ क्विंटल, तूर-२८७७ क्विंटल,मुग-४०२ क्विंटल, उडीद-२०३क्विंटल, कापूस ७७११ क्विंटल (१७ लाख १३ हजार पाकिटे), सोयाबीन बियाणे- २५ हजार ७३८ क्विंटल. इतकी मागणी आहे. सर्व पिके मिळून जिल्ह्यात ५१ हजार ७२५ क्विंटल बियाणे मागणी आहे. त्यापैकी महाबीज, एनएससी व खाजगी पुरवठादार यांच्याकडून पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

खतांची मागणी,  जिल्ह्यात रासायनिक खतांचा सरासरी वापर २ लाख ७३ हजार १९३ मे.टन इतका असून खरीप हंगाम २०२६ साठी ३ लाख ९५ हजार ७४९ मे.टन इतकी मागणी आहे. त्यात युरिया- १ लाख ५१ हजार २३० मे.टन, डीएपी- ४७ हजार ३६० मे.टन, एम.ओ.पी.-२६४१२ मे.टन., एनपीके-१ लाख ४१ हजार ९५५ मे.टन, एसएसपी- २८७९२ मे.टन असे एकूण ३ लाख ९५ हजार ७४९ मे.टन खतांची मागणी आहे. जिल्ह्यासाठी मंजूर आवंटन २ लाख ९२ हजार ७०० मे.टन इतके आहे. हे आवंटन आवश्यकतेनुसार पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२५ अखेर शिल्लक खत साठा १ लाख २३ हजार ९२८ मे.टन इतका आहे.

विक्री व गुणनियंत्रण-जिल्ह्यात कृषी निविष्ठा विक्रीसाठी तब्बल ८९९२ विक्रेते आहेत. त्यात बियाणे विकेते-४४७६, खत विक्रेते-२३८६, कीटक नाशक विक्रेते-२१३० असे आहेत. वितरण विक्री प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय १ याप्रमाणे ९ व जिल्हास्तरीय १ असे १० भरारी पथके आहेत. गुणनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय ४ निरीक्षक तर तालुकास्तरीय १८ असे २२ निरीक्षक आहेत.लिंकींग केल्यास कारवाई- जिल्हाधिकारी गौडाजिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, बियाणे विक्री करण्याआधी त्यांची उगवण क्षमता तपासणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय बियाणे विक्री करु अनका. खतांच्या पुरवठ्याचे नियमन करतांना गरजेला प्राधान्य द्या नंतर संरक्षित साठ्याचे नियोजन करा. खताचे लिंकींग करु नका. अशाप्रकारे लिंकींग करुन शेतकऱ्यांची अडवणूक केल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. एकंदर एल निनो आणि आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभुमिवर कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी पारदर्शकता जपून शेतकऱ्यांना वेळेत बियाणे, खते उपलब्ध करुन द्यावे. जिल्ह्यात डिजेल, पेट्रोलचा पुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे कृषी निविष्ठांच्या वाहतुकीला कोणतीही अडचण येणार नाही,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक कायद्याची (PCPNDT) जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातील जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी गुरुवार दि.१४ ऑगस्ट रोजी ‘कन्या सन्मान दिवस’ साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

टाटा मुंबई मॅरेथॉन मध्ये मुंबई तील ज्येष्ठ नागरिक सहभागी होणार

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री धन–धान्य कृषी’ योजनेचा शनिवारी शुभारंभ – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कोपरखैरणे विभाग कार्यालयात अचानक भेट देत आयु्क्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली कामकाज पाहणी,अधिकारी, कर्मचा-यांशी संवाद साधत लोकाभिमुख कार्यप्रणाली राबविण्याचे दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta