vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ग्रामविकास भवनातून ग्रामीण प्रशासनाला मिळणार नवी दिशा – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास भवनाच्या विविध सुविधांची पाहणी

ग्रामविकास भवनातून ग्रामीण प्रशासनाला मिळणार नवी दिशा – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे,ग्रामविकास भवनाच्या विविध सुविधांची पाहणी..

मुंबई, प्रतिनिधी: खारघर, नवी मुंबई येथे उभारण्यात आलेल्या ग्रामविकास भवन या शासकीय इमारतीची आज ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी पाहणी केली. ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय समन्वय तसेच प्रशिक्षण उपक्रमांसाठी हे संकुल महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून विकसित करण्यात आले आहे.

यावेळी ग्रामविकास भवनातील विविध प्रशासकीय विभाग, प्रशिक्षण कक्ष, बैठकींसाठी उपलब्ध सुविधा तसेच इतर पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी सक्षम व आधुनिक प्रशासकीय यंत्रणा उभारणे आवश्यक असून, त्यादृष्टीने ग्रामविकास भवनाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

ग्रामीण विकास विभागाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता, समन्वय आणि कार्यक्षमता निर्माण व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील ग्रामविकासाशी संबंधित विविध उपक्रम, प्रशिक्षण प्रक्रिया आणि प्रशासकीय नियोजन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामविकास भवन हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

0000

संबंधित पोस्ट

अनुकंपा मेळाव्यातून नियुक्ती प्रक्रियेला गती*नियुक्ती प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्यात येईल – जिल्हाधिकारी*

vishwatmaklokswamivarta

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

मेळघाटच्या नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्नकरणार*जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत विविध विषयांवर चर्चा

आरोग्य सेवक (पुरुष) पदावरून ११ कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते आदेश वितरण

त्वरित कारवाई करत, मुंबई वाकोला पोलिसांनी 60 वर्षीय व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली

vishwatmaklokswamivarta

भेसळयुक्त खाद्यतेलाचा ४२ हजार २९४ किलो साठा जप्त;अन्न व औषध प्रशासन विभागाची ऑगस्टपासूनची कारवाई

vishwatmaklokswamivarta