vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुकंपा मेळाव्यातून नियुक्ती प्रक्रियेला गती*नियुक्ती प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्यात येईल – जिल्हाधिकारी*

अनुकंपा मेळाव्यातून नियुक्ती प्रक्रियेला गती*नियुक्ती प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्यात येईल – जिल्हाधिकारी*

 

🔷️गडचिरोली प्रतिनिधी : जिल्ह्यात अनुकंपा नियुक्ती प्रकरणांना गती देण्यासाठी शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आज अनुकंपा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये २८६ उमेदवारांच्या सामाईक प्रतीक्षा यादीतून ७३ उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडून तीन पसंतीच्या विभागांची नावे अर्जावर भरून घेण्यात आली. नोंदवलेल्या प्राधान्यक्रमानुसार उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या विभागात सेवा करण्याची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये विविध १३ विभागांकडून प्राप्त झालेल्या ५३ पदांच्या मागणीपैकी, प्राथमिक टप्प्यात ४३ पदे अंतिम करण्यात आली आहेत. याच पदांवर नियुक्ती प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या वेळी उमेदवारांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक प्रमाणपत्रांची काटेकोर पडताळणी करण्यात आली, तसेच शारीरिक तपासणीही करण्यात आली.

या मेळाव्यासाठी १५ नियुक्ती अधिकारी कार्यालयांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उमेदवारांना मार्गदर्शन करताना, अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकतेने राबविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, तसेच आस्थापना शाखेचे तहसीलदार संजय जयस्वाल व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

ऑटोरिक्षा, मीटर्ड टॅक्सी चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सार्ध शताब्दी वर्षानिमित्त**केवडिया (गुजरात) येथे महाराष्ट्राचा चित्ररथ*1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान केवडिया गुजरात येथे होणाऱ्या भारत पर्व महोत्सवातमहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग…

vishwatmaklokswamivarta

जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान..

हॉटेल्सचालक, अन्न व्यावसायिकांचे प्रशिक्षण ग्राहक देवतेचा ‘नैवेद्य’ भेसळमुक्त असावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महिला बचत गटांच्या महिलांचा मालमत्ताकर बिल वाटपास ‘हातभार’; ३० दिवसांतच विक्रमी बिल वाटप!तब्बल २१२ कोटींचे करसंकलन; ‘ऑनलाइन’ स्वरूपात कर भरण्यास करदात्यांची पसंती!बिल वाटप मोहिमेमध्ये तब्बल २०० महिलांचा सहभाग३० जूनपूर्वी कर भरून सवलत घेण्याचे आवाहन!

आजच्या राष्ट्रीय व राज्य नेतृत्वाच्या कार्याला एकात्म मानवदर्शन विचारांचे पाठबळ – कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा