vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी

कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत पाणी उपसा बंदी

सांगली, प्रतिनिधी : कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणे अत्यावश्यक असल्याने सातारा व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 11 व 49 मधील तरतुदीनुसार गुरुवार, दिनांक 04 जून 2026 रोजीच्या 00 वाजलेपासून ते रविवार दिनांक 07 जून 2026 रोजीच्या 24 वाजेपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या व बिगर सिंचन (औद्योगिक कारणास्तव) सर्व योजनांचे पाणी उपसा बंदी करण्यात येत असल्याचा उपसा बंदी आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी निर्गमित केला आहे.

या कालावधीमध्ये पिण्याचे पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांव्यतिरीक्त इतर कारणासाठी (खाजगी) कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून, संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीकरिता रद्दबातल करण्यात येऊन, उपसा संच सामुग्री जप्त करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, धरणातील मर्यादित पाणी साठ्याचा विचार करुन बिगरसिंचन पाणी वापरकर्त्यांनी सांडपाणी/औद्योगिक वापरातील पाणी, थेट नदीत सोडून पाणीसाठा प्रदूषित करु नये. प्रदूषित पाणी वाहून जाण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सर्व संबंधितांनी याची दक्षता घेवून पाणीनाश टाळण्यास सहकार्य करावे, आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, सोमवार, दिनांक 08 जून 2026 रोजीच्या 00 वाजलेपासून ते गुरूवार दिनांक 11 जून 2026 रोजीच्या 24 वाजेपर्यंत उपसा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी-विक्रीवर पोलिसांना माहिती देणे अनिवार्य

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे मिरज येथेआपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रील

vishwatmaklokswamivarta

चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला गौरव केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची उपस्थिती

नागपूर जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नियोजन भवन येथे जलसंधारणासह विविध विकास कामांचा आढावा

उद्योजकांना उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजना…

अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधानपरिषदेत निरोप..