vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), यांच्याकडुन  मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण 

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), यांच्याकडुन  मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण

जालना प्रतिनिधी :- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र, जालना पुरस्कृत सर्वसाधारण प्रवर्ग व विशेष घटक प्रवर्गातील युवक-युवतींकरिता सन 2026-27 अंतर्गत मोफत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन अंबड आणि घनसावंगी येथे करण्यात आले आहे. लाभार्थीनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वंयरोजगार निर्माण करावा हा कार्यक्रम आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याने ब्यूटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमावर-1 महिना कालावधीच्या या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये फेशिअल, त्वचेची निगा हेअर कट ऊलटी, मेनिक्युअर अॅण्ड पेडिक्युअर, वॅक्स थेअरी, हेअर स्टाईल आठचा आंबाडा, हेअर कट यु कट, स्ट्रेट कट, हेड मसाज, डायचे प्रकार, ऑक्सीब्लिच, ब्रायडल मेकअप, केस रचना विषयी माहिती इत्यादीचे प्रात्याक्षिकद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसेच उद्योजकता विकास प्रशिक्षण, या मध्ये उद्योजकिय गुण संपदा, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकासासाठी सिध्दी प्रेरणा प्रशिक्षण, बाजारपेठ, पाहणीतंत्र व तंत्र विपणन व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, कर्ज योजना व कर्ज प्रकरणे व्यवस्थापन व विक्री कौशल्य लघु उद्योग विषयक कायदे, शासकीय धोरणे, अकाउंटस, लघु उद्योजकाचे व्यवस्थापन, बँकेचे व्यवहार इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. सदरील कार्यक्रम हा संपुर्णता मोफत असुन यासाठी लाभार्थी किमान 7 वी पास, वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष पात्रता धारक इच्छुक लाभार्थीना प्रवेश व अधिक माहिती साठी कार्यक्रम आयोजक श्री. कैलास भाबट मो. 9689673942, यांच्याशी किंवा श्री. विनोद तुपे प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना. फोन. नं. 02482-220592

येथे दि.16 जुन, 2026 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक योगेश सारणीकर, व विभागीय अधिकारीसुदाम थोटे, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

भारतीय रेल्वेने तीन विभागांमध्ये 472 किमी मार्गावर ‘कवच 4.0’ सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून अंमलबजावणीला दिली गती एकाच दिवसात कवच प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वाधिक कार्यान्वयन साध्य

vishwatmaklokswamivarta

आम आदमी पार्टी च्या प्रदेश सचिव पदी सुग्रीव मुंडे यांची नियुक्ती

जातीचे दाखले तयार करण्यासाठीआयोजित विशेष शिबीराचा लाभ घ्या  – तहसिलदार अश्विनी वरूटे

vishwatmaklokswamivarta

उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार-उद्योग मंत्री उदय सामंत*मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार

मारवाडी गल्लीतील रस्त्याची डागडूजी : नागरिकांत आनंदशिवसेना शहरप्रमुख दुर्गेेश काठोठीवाले यांच्या मागणीला यश..

निश्चित कालमर्यादेत महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी,जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्ग अतिक्रमणमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे निर्देश,मिशन मोडवर कार्यवाही; अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्याचे आदेश..