vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

डोलाया सागरी किनारा सखोल स्वच्छता मोहीमेतून जागतिक पर्यावरण दिन साजरा

डोलाया सागरी किनारा सखोल स्वच्छता मोहीमेतून जागतिक पर्यावरण दिन साजरा

        नवी मुंबई प्रतिनिधी-  जागतिक पर्यावरण दिनाची यावर्षी सन 2026 ची मध्यवर्ती संकल्पना ‘हवामानासाठी आत्ताच कृती (Now for Climate)’ जाहीर करण्यात आलेली असून त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम राबविले आहेत व यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभागावर भर दिलेला आहे.

असाच एक सागरी किनारा स्वच्छतेचा महत्वपूर्ण उपक्रम नवी मुंबई महानगरपालिका व ॲडशिव टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा.लि. यांच्या सहयोगाने पाम बिच मार्गानजिक समुद्रेश्वर मंदिराच्या बाजूच्या डोलाया सागर किना-याजवळच्या पाणथळ जागेत राबविण्यात आला.

   यामध्ये महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी सहभागी होत सागरी किना-याच्या सखोल स्वच्छतेत प्रत्यक्ष योगदान दिले. या मोहीमेत महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मींप्रमाणेच हेंकेल कंपनीचे प्रतिनिधी, इन्व्हायरमेंट लाईफ फाऊंडेशनचे स्वयंसेवक, नेक्सस मॉलचे कर्मचारी अत्यंत उत्साहाने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

   यावेळी सहभागी 200 हून अधिक कर्मचारी, नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहासोबत किना-यावर आलेला प्लास्टिक व तत्सम 110 गोणी कचरा गोळा केला. या सागरी किनारा सखोल स्वच्छता मोहीमेव्दारे ‘हवामानासाठी आत्ताच कृती’ या जागतिक पर्यावरण दिनाच्या मध्यवर्ती संकल्पनेला अनुसरून प्रत्यक्ष कृती करण्यात आली

00000

 

संबंधित पोस्ट

आपत्ती व्यवस्थापनकरिता उपाययोजना करण्यासाठीदि.30 व दि.31 मे या दोन दिवसांसाठी पायरी मार्ग राहणार पूर्णपणे बंद

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन*

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगामात उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाच्या शिफारशीनुसार पेरणी करावी

संकटातील मुलांसाठी जीवनरेखा… : १०९८ चाईल्ड हेल्पलाईन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता-महाराष्ट्र दिनी सीईआर निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेस आयकियामार्फत 2 सक्शन वाहने प्रदान,केंद्र सरकारच्या नमस्ते योजने अंतर्गत 230 सफाई मित्रांना पीपीई किटचे वाटप व प्रशस्तीपत्रे वितरण

बँकेत दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी शुक्रवारी महामेळावा- अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ”माझा पैसा माझा अधिकार”- खातेदारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta