vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईत शाळा प्रवेशोत्सव झाला आनंदोत्सव

नवी मुंबईत शाळा प्रवेशोत्सव झाला आनंदोत्सव

 

    नवी मुंबई प्रतिनिधी-      पताका, रांगोळ्या यांनी सजवलेल्या शाळा, कुठे ढोल ताशांचा तर कुठे लेझीमचा गजर अशा उत्साही वातावरणात नवी मुंबई महानगरपालिकेच्या 57 प्राथमिक आणि 23 माध्यमिक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव समारंभ जल्लोशात संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये महापालिका पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, अधिकारी यांनी उपस्थित राहून गुलाबपुष्प व चॉकलेट देत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिला दिवशी स्वागत केले.

          महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री ना.श्री.गणेश नाईक यांनी महापौर श्रीम. सुजाता पाटील व उपमहापौर श्री. दशरथ भगत यांच्यासह वाशी से.14,15 येथील नमुंमपा शाळा क्र.28 मध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी मंत्री महोदयांच्या शुभहस्ते नव्याने सुरु होत असलेल्या बालवाटीका – नर्सरी इंग्रजी माध्यम वर्गाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शाळेच्या आवारात वृक्षारोपणही करण्यात आले.

          महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नमुंमपा शाळा क्र.15 शिरवणे गाव या ठिकाणी उपस्थित रहात शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदाने शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

          विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी तसेच शाळेमध्ये मुलांची उपस्थिती आणि गुणवत्ता या दोन्हीमध्ये भरीव वाढ व्हावी या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शाळा प्रवेशोत्सव समारंभ आयोजित करण्यात आला असून आनंददायी वातावरणात दडपण विरहित शिक्षण हे भूमिका जपली जात आहे.

          यावेळी पहिल्यांदाच शाळा प्रवेश घेतलेल्या लहान मुलांच्या पायाचे ठसे को-या कागदावर घेण्यात आले. या संकल्पनेचे कौतुक करीत ना.श्री. गणेश नाईक यांनी मुलांच्या पावलांचे हे ठसे त्या विद्यार्थ्यासाठी मोठे झाल्यावर अनमोल ठेवा असेल अशी भावना व्यक्त केली. यावेळी अनेक शाळांमध्ये उभारलेल्या सेल्फी स्टँडवर विद्यार्थ्याची छायाचित्रे काढून पालकांनीही विद्यार्थ्यांसमवेत आनंद साजरा केला. काही शाळांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

          यावेळी शालेय पोषण आहार सुविधा व इतर सुविधा, शाळा व्यवस्थापन समिती, 100 टक्के पट नोंदणीसाठी गृहभेटी, विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांवर स्वच्छतेच्या सवयींचे संस्कार व्हावेत व त्यांना अभ्यासासोबतच क्रीडा व कला गुण फुलविण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करावे अशा सूचना मान्यवरांमार्फत शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना करण्यात आल्या.

0000

संबंधित पोस्ट

जालन्यात अनधिकृत बांधकामावर कारवाई: परवानगीपेक्षा अधिकचे बांधकाम करणार्‍यांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

बोरघाट महामार्गावर जड-अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

उद्योगांसाठी कर्ज योजनेचे अर्ज तातडीने निकाली काढावेत- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

अवैध धंद्यांसाठी ड्रोनचा वापर करणाऱ्या गौणखनिज व रेती माफियांवर कठोर कारवाई करापालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निर्देश..

vishwatmaklokswamivarta

मुंबईच्या मस्जिद बंदर येथे इमारतीला आग; धुरामुळे 2 जणांचा मृत्यू

vishwatmaklokswamivarta