vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मणदूर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सांगली जिल्हाधिकारी यांनी बैठक घ्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मणदूर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर सांगली जिल्हाधिकारी यांनी बैठक घ्यावी – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

 

मुंबई, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मणदूर येथील वारणा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी, सांगली यांनी सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह लवकरात लवकर बैठक घेऊन मार्ग काढावा, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार सत्यजित देशमुख, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रभारी मुख्य अभियंता अलका अहिरराव तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वारणा प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसन, जमीन, मूलभूत सुविधा आणि इतर प्रलंबित प्रश्न संवेदनशीलतेने हाताळावेत. तसेच आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया गतीने पूर्ण करून प्रश्नांच्या सोडवणुकीस प्राधान्य द्यावे, असे निर्देश विखे-पाटील यांनी दिले.आमदार सत्यजित देशमुख यांनी मणदूर परिसरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणींची सविस्तर माहिती दिली.

००००००

 

संबंधित पोस्ट

मरावे परी देहरुपी उरावे..!अवयवदान करा.. अवयवदान करा..!कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी आहे…

vishwatmaklokswamivarta

लोकसंस्कृतीचे विपुल लेखन करणाऱ्या- -ताराबाई भवाळकर..

vishwatmaklokswamivarta

नशामुक्त छत्रपती संभाजीनगरःमानवी साखळीद्वारे जनजागृतीनशामुक्त जीवनासाठी संकल्प करु या – जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

राज्यातील घरकुल योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देणार- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; १.२० कोटींचा मुद्देमाल जप्त नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य दक्षता पथकाची कारवाई; तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

तेल उद्योग कंपन्याचे संरक्षण क्षमता महोत्सवातून जनजागृती अभियान

vishwatmaklokswamivarta