vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 करिता इच्छुक उद्योजकांनी अर्ज सादर करावेत

ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 करिता इच्छुक उद्योजकांनी अर्ज सादर करावेत

 रायगड-अलिबाग, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने “ग्रामोद्योग भरारी पुरस्कार-2026 साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार योजना सुरु केली आहे. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे पुरस्कार योजनेत प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतात व काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. संकल्पनेतुन उद्योगाच्या वृध्दीसाठी व उद्योगाला चालना व गती देण्यासाठी सन 2023 पासून राज्यस्तरीय “ग्रामोद्योग भरारी पुरस्कार” सुरु करून माध्यमातून प्रथम, व्दितीय व तृतीय, उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येत आहेत. मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय घेवून यशस्वीपणे उद्योग उभारणी करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध केलेल्या मंडळाच्या यशस्वी उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा याकरिता दि.13 जुलै 2026 रोजी पासून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कार 2026 करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. twiter नामांकन अर्ज मंडळाच्या www.mskvib.org, या संकेतस्थळावर तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज दि.28 जुलै 2026 पूर्वी जिल्हा कार्यालयात पाठवावेत. अधिक माहितीसाठी संपर्क :- जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगड, जिल्हा उद्योग केंद्र इमारत, ठिकरुळ नाका, रायगड बाजारजवळ, अलिबाग, (दूरध्वनी क्र.02141-222642),मोबाईल क्र.8356051494, ई-मेल आयडी: dvioraigad@mskvib.org, .

संबंधित पोस्ट

शासकीय स्तरावर उद्योजकांना सर्वोतोपरी मदत करू- जिल्हाधिकारी अशोक काकडे,गुंतवणूक शिखर परिषदेत जिल्ह्यात साडेतीन हजार कोटींची गुंतवणूक

सातारा जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दल सहकार्य करेल-पोलीस अधीक्षक तुषार दोशी

गोल्डमन सॅक्सच्या नव्या मुंबई कार्यालयाचे  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन,तिसरी मुंबई आर्थिक विकासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात – राज्य सफाई कर्मचारी आयोग अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर

खरीप पीकस्पर्धा जाहीर; अर्जाची मुदत 10 ऑगस्टv अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील ढासाळवाडी गावासाठी टँकर मंजूर

vishwatmaklokswamivarta