vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

शासकीय विभागानी नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा द्याव्यात – सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी,पारनेर तालुक्यात सेवा वितरणाचा आढावा

शासकीय विभागानी नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा द्याव्यात – सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी,पारनेर तालुक्यात सेवा वितरणाचा आढावा

अहिल्यानगर, प्रतिनिधी  : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना विहित कालमर्यादेत, पारदर्शक व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक विभागाने उत्तरदायित्व स्वीकारून काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्याने समन्वयाने आणि एकजुटीने काम करून जिल्ह्याची कामगिरी अधिक उंचावावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.

पारनेर तहसील कार्यालयात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार गायत्री सैंदाने, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, मुख्याधिकारी प्रियांका शिंदे यांच्यासह तालुकास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी म्हणाल्या की, प्रत्येक विभागाने नागरिकांना किमान ९० टक्क्यांहून अधिक सेवा विहित कालमर्यादेत देण्याचे उद्दिष्ट साध्य करावे. ज्या विभागांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी आहे, त्यांनी त्यामागील कारणांचा अभ्यास करून तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात. जिल्ह्याचे राज्यातील आघाडीचे स्थान कायम राखण्यासाठी प्रत्येक विभागाने अधिक जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने काम करणे आवश्यक आहे.

 

त्या पुढे म्हणाल्या की, सेवा वितरणात तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक अडचणी येत असल्यास संबंधित अधिसूचनांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी संबंधित विभागामार्फत प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावेत. तसेच अधिकाऱ्यांच्या स्तरावर सेवा वितरणात होणारा विलंब टाळण्यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना त्वरित राबवून नागरिकांना अधिनियमात नमूद केलेल्या निर्धारित कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून द्याव्यात.

 

अहिल्यानगर जिल्ह्याने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक तालुक्याने समन्वयाने आणि कार्यक्षमतेने काम करून जिल्ह्याची एकूण कामगिरी अधिक उंचावावी. प्रत्येक तालुक्याची चांगली कामगिरी जिल्ह्याची एकूण यशाची टक्केवारी वाढविण्यास हातभार लावणार आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यावर सर्व विभागांनी भर द्यावा, असे आवाहनही राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी केले.*सुपा व कामरगाव येथील सेतू व ई-सेवा केंद्रांची पाहणी*

राज्य सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी सुपा आणि कामरगाव येथील सेतू व ई-सेवा केंद्रांना भेट देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया, अर्ज नोंदणी, पोहोच देण्याची कार्यपद्धती, ऑनलाइन सेवा प्रणाली, अभिलेखांची देखभाल, तक्रार निवारण व्यवस्था तसेच नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा यांचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक व विहित कालमर्यादेत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रांमार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

भारतीय लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · आणीबाणीच्या ५० वर्षानिमित्ताने संविधान हत्या दिवस कार्यक्रम · लोकतंत्र सेनानींचा सत्कार मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताच्या या वेगवान विकासात लोकशाहीने आपले महत्व अधोरेखित केले आहे. भारतीय परंपरेत मुळे असणारी लोकशाही अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनीच सहकार्य करूया, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण – भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अध्याय, संविधान हत्या दिवस २०२५ निमित्ताने लोकतंत्र सेनानींच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथील दरबार सभागृहात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके उपस्थित होते. आणीबाणी ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील सल असल्याचे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, आणीबाणी ही देशावर लादली गेली. या काळात देशविघातक कार्य झाले. जो कुणी आणीबाणीचा विरोध करेल त्याला कारागृहात डांबले जायचे. असह्य अत्याचार त्या काळात नागरिकांना सहन करावे लागले. आणीबाणीमुळे देशातील लोकशाहीवरच घाला घालण्यात आला. राज्यघटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांवर गदा आणण्यात आली. त्यातूनच आणीबाणीविरोधात जनमत तयार झाले. आपल्या विचारात, कार्यात व भविष्यातील योजनांमध्ये राष्ट्र प्रथम असले पाहिजे. स्वत:साठी न जगता राष्ट्रासाठी जगता आले पाहिजे. दुसऱ्यांसाठी जगा, हा मंत्र भारतीय लोकशाहीने दिला आहे. आज जगामध्ये सर्वात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश आहे. भारत विकसित होण्याकडे आगेकूच करीत आहे. विकासाच्या प्रवासाचा इथपर्यंतचा टप्पा हा मजबूत लोकशाहीमुळेच शक्य झाला आहे, त्यामुळे लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भारतीयाने निश्चय केला पाहिजे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बीजे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील हल्ल्याचा प्रयत्न होता. मात्र लोकतंत्र सेनानींनी मोठा लढा देत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यासाठी सेनानींना मोठा संघर्ष करावा लागला. या लोकतंत्र सेनानींना सन्मानाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतून मानधन देवून शासन त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रबळ लोकशाहीची बिजे रोवली आहेत. आणि म्हणूनच आणीबाणीमुळे सेनानींचे कुठल्याही प्रकारचे मानसिक खच्चीकरण होवू शकले नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकतंत्र सेनानींचा गौरव केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरात सुधारणांसाठी आणीबाणीपूर्वी अनेक आंदोलने सुरू होती. या आंदोलनांचा धसका घेत तत्कालीन राजवटीने देशावर आणीबाणी लादली. ही आणीबाणी संविधानाच्या हत्येचे पातक ठरली. ४२ व्या घटनादुरूस्तीने संविधानाचा आत्माच काढण्याचे प्रयत्न झाले. मुलभूत अधिकार गोठवित मार्गदर्शक तत्वांना महत्व दिले गेले. या काळात भारतीय न्यायव्यवस्थेचेही महत्व कमी करण्यात आले.

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे – अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी विभाग-एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

vishwatmaklokswamivarta

२५ ऑगस्ट ठाण्यात ‘आनंद चित्र कथा’२५ व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रकलेच्या प्रदर्शनातून धर्मवीर आनंद दिघेसाहेबांना आदरांजली

vishwatmaklokswamivarta

मलकापूर येथील स्टेट बॅंकेच्या लघू व मध्यम उद्योग शाखेत परकीय चलन सुविधा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.. व्यापारी, उद्योजक व निर्यातदारांना दिलासा

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा..