vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

मिशन वात्सल्य व मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक संपन्न

मिशन वात्सल्य व मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक संपन्न

जालना, प्रतिनिधी : महिला व बालविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन वात्सल्य व मिशन शक्ती’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात एकल महिला पुनर्वसन, मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती तसेच मिशन वात्सल्य त्रैमासिक आढावा बैठक यांचे आयोजन करण्यात आले होते.

          या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे,पोलीस उप अधीक्षक श्री. निकाळजे, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक मंगेश केदार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गणेश चिमणकर, युनिसेफच्या सदस्य अल्पा वोरा यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी यांची उपस्थिती होती.

        जालना जिल्हात घटस्फोटित, परित्यक्ता, विधवा व अविवाहित अशा एकूण 69,358 एकल महिला आहेत. यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वकष प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी तालुकानिहाय एकल महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करुन, यांना सर्वप्रथम शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच या महिलांसाठी आरोग्य, पोषण व त्यांच्यासाठी शासन स्तरावरुन ज्या काही योजना राबविल्या जातात, त्यांची माहिती व लाभ पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या महिलांचा समावेश महिला बचत गटात करणे, बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवून देणे, रोजगार विषयक कार्यशाळा आयोजित करणे. तसेच या बैठकीत एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सद्यस्थिती, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, तसेच त्यांना आर्थिक, सामाजिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

          मिशन शक्ती अंतर्गत महिलांच्या सुरक्षितता, सक्षमीकरण, स्वावलंबन व रोजगारनिर्मितीच्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. महिलांवरील हिंसाचार प्रतिबंध, तक्रार निवारण यंत्रणा बळकट करणे, तसेच विविध विभागांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ प्रभावीपणे सर्व पात्र लाभार्थांना देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

बुलढाणा ग्रंथोत्सवाची उत्साहात सांगता; दोन दिवसांत ३ लाखांहून अधिक ग्रंथांची विक्री…

उद्योजकतेची नवी पहाट, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणी मध्ये बदल*

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या अंतिम सुधारित उत्तरसूचीबाबतआक्षेप असल्यास दि.10 फेब्रुवारी पर्यंत नोंदवावा..

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ नागरिकांसाठी लाभदायी; एका छताखाली २३ शासकीय सेवा– उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर

रुग्णावरील उपचार दाव्याची रक्कम त्याच महिन्यात अदा करण्यात येणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर पुणे येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे-जन आरोग्य सेवा गौरव पुरस्काराचे वितरण

vishwatmaklokswamivarta