vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

म्हाडाशी संबंधित विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांचा उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला आढावा रहिवाशांचे म्हणणे ऐकून सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश

म्हाडाशी संबंधित विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांचा उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला आढावा-रहिवाशांचे म्हणणे ऐकून सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश

मुंबई, प्रतिनिधी: म्हाडा प्राधिकरणाशी संबंधित विविध गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्वसन आणि पुनर्विकासाच्या प्रश्नांबाबत विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येणे बैठक झाली. बैठकीत बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासह मुंबईतील विविध गृहनिर्माण संस्थांच्या प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन सकारात्मक मार्ग काढण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत लॉटरीद्वारे होणाऱ्या घरवाटपातील अडचणी, वरळी बीडीडी चाळीतील संबंधित कुटुंबांना पर्यायी निवास आणि संक्रमण शिबिरातील नागरिकांच्या मागण्या यावर यावेळी चर्चा झाली. तसेच लोअर परळ येथील सरस्वती बिल्डिंगमधील दहा रहिवाशांना पर्यायी सदनिका देणे आणि ना. म. जोशी मार्गावरील ३६५, शिवशक्ती पार्क येथील तानवडे व अन्य ३० रहिवाशांच्या निवेदनावर चर्चा झाली.

भायखळा येथील गीतांजली बिल्डिंगचा पाच म्हाडा इमारतींच्या क्लस्टरमध्ये समावेश करणे, एसव्हीपी नगर सोसायटीतील एचआयजी आणि एलआयजी पुनर्वसन, टागोर नगरमधील घरकुल सोसायटीच्या कुटुंबांना कायमस्वरूपी मालकी हक्क देणे, अभुदयनगरमधील इमारतींचे पुनर्विकास, रुस्तम ताडीवाला चाळ तसेच शाहसदन सोसायटीशी संबंधित निवेदनांवरही यावेळी चर्चा झाली.

बैठकीस म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह म्हाडाचे संबंधित अधिकारी आणि संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

महापारेषणच्या वार्षिक दैनंदिनी व प्लॅनर-2025 चे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते गुजरातमधील आणंद इथे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ या देशातील पहिल्या सहकारी विद्यापीठाचे भूमिपूजन

डॉ. संजय मुन हे फुले – आंबेडकरी चळवळीचे प्रभावी प्रसारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमा यशवंतराव आंबेडकर यांचे गौरोद्गार : डॉ. संजय मुन यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करावे

काँग्रेस माजी अध्यक्ष सोनिया गांधीं यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्यावर केली ‘Poor Lady’ विवादित टिपण्णी; बिहारमध्ये खटला दाखल

vishwatmaklokswamivarta

अमरनाथ यात्रेच्या तयारीला वेग देण्यासाठी व यात्रा सुरळीत पडावी यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) आज एक आढावा बैठक