vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

जिल्ह्यात 29 सप्टेंबरला 15 ठिकाणी रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र 2026 चे आयोजन- युवक-युवती व उद्योगांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

जिल्ह्यात 29 सप्टेंबरला 15 ठिकाणी रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र 2026 चे आयोजन- युवक-युवती व उद्योगांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 

         सांगली, प्रतिनिधी : देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास व उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र हा राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी 800 रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सांगली जिल्ह्यात जिल्हास्तरावर तसेच विविध तालुकास्तरावर एकूण १५ ठिकाणी दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व आवडीनुसार विविध उद्योग व आस्थापनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना विविध कंपन्या व आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष मुलाखत व निवड प्रक्रियेसाठी सक्षम करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यात पुढील ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. (1) सांगली इंडस्ट्रियल स्कूल, प्रा. आय.टी.आय., सांगली, (2) राजारामबापू पाटील प्रायव्हेट आय.टी.आय., (3) व्यंकटेश्वरा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पेठ, (4) लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विटा, (5) विश्वासराव नाईक कला, वाणिज्य आणि बाबा नाईक विज्ञान महाविद्यालय, (6) श्री राजशेखर रामराव पाटील महाविद्यालय, सावळज, (7) पलुस शिक्षण प्रसारक मंडळ, पलूस, (8) सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत, (9) शिक्षण प्रसारक संस्था, कवठेमहांकाळ, (10) राजमती भवन मॅरेज हॉल नेमिनाथनगर, निशांत कॉलनी, सांगली, (11) श्रीमती सुलोचना भट महिला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कुंडल, (12) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, MIDC परिसर, कडेगाव, (13) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आटपाडी, (14) एम. जी. जाधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भोसे, (15) पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव.

रोजगारपूर्व तयारीसाठी उमेदवारांना मोफत प्रशिक्षण ,रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रोजगार इच्छुक युवक-युवतींना जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) रोजगारपूर्व तयारीसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये CV/Resume तयार करणे, स्वपरिचय, मुलाखत कौशल्य, Mock Interview, व्यक्तिमत्त्व विकास व संवाद कौशल्य याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखत व निवड प्रक्रियेसाठी आवश्यक तयारी करता येणार आहे. या अनुषंगाने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दि. ०७ सप्टेंबर २०२६ ते दि. १० सप्टेंबर २०२६ तसेच दि. २१ सप्टेंबर २०२६ ते दि. २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत रोजगारपूर्व तयारी प्रशिक्षणाची सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.

उद्योग व आस्थापनांसाठीही महत्त्वाची संधीरोजगार महाकुंभाच्या माध्यमातून उद्योग, कंपन्या व विवि आस्थापनांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पात्र व कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील विविध उद्योग व आस्थापनांनी आपल्या उपलब्ध रिक्त पदांची नोंदणी करून रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, जेणेकरून अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सांगली जिल्ह्यातील सर्व उद्योग, कंपन्या, आस्थापना व नियोक्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या रिक्त पदांची नोंदणी करावी.         जिल्ह्यातील रोजगार इच्छुक युवक-युवती, ITI, पदवी, पदविका तसेच विविध तांत्रिक व व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी सोबत दिलेल्या Scanner/Google Form Link द्वारे नोंदणी करून आपल्या जवळच्या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे व रोजगारपूर्व मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, तसेच, मंगळवार, दिनांक 29 सप्टेंबर, 2026 रोजी, प्रत्यक्ष मुलाखतीस येताना, आपली सर्व मूळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो आणि बायोडाटाच्या किमान तीन छायांकित प्रती सोबत घेऊन याव्यात.         या मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा. रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजयनगर, सांगली या कार्यालयाशी संपर्क साधावा. संपर्क क्रमांक – ०२३३ २९९०३८३, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

      उमेदवार नोंदणीकरिता उद्योजक नोंदणीकरिता      Google Form Link:- Google Form Link:-https://forms.gle/vBTzRQKYBBuBT4em7 https://forms.gle/Mrz8Gc3ofqq37wwr6

00000

संबंधित पोस्ट

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्व प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरती-दि.१ ते ८ जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा

इंदिरा गांधी राष्ट्रीय योजनेतील लाभार्थ्यांनी मोबाईल ॲपद्वारे हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 68 उमेदवारांची निवड

उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार-उद्योग मंत्री उदय सामंत*मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार