
राज्यातील सत्तधारी पक्ष आणि विरोधी पक्षात सध्या क्रूझ ड्रग पार्टी प्रकरण आणि समीर वानखेडे यांच्यावरून आरोप प्रत्यारोप सुरु हर्बल तंबाखूवरून फडणवीसांचा नाव घेता नवाब मलिकांना टोला
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील सत्तधारी पक्ष आणि विरोधी पक्षात सध्या क्रूझ ड्रग पार्टी प्रकरण आणि समीर वानखेडे यांच्यावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या प्रकरणात राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणात एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपल्या जावयावर केलेल्या कारवाईत आपल्या जावयाकडे ड्रग्ज नाही तर हर्बल तंबाखू सापडली होती असंही ते म्हणाले. त्यावरून त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्याचा जावई गांजा तस्करीमध्ये सापडला होता. त्यावर तो मंत्री म्हणतो तो गांजा नाही तर हर्बल तंबाखू होती. त्यावर आमच्या सदाभाऊ खोतांनी सांगितलं, तुमच्या जावयाला हर्बल तंबाखू पिकवण्याची परवानगी दिली, मग शेतकऱ्यांनाही द्या असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एकुणच या प्रकरणावरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाद मलिक यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.



