vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई ड्रग्स केस प्रकरणात साक्षीदार असलेला किरण गोसावी पुणे पोलिसांसमोर शरण

मुंबई ड्रग्स केस प्रकरणात साक्षीदार असलेला किरण गोसावी पुणे पोलिसांसमोर शरण

मुंबई प्रतिनिधी: मुंबई ड्रग्स केस प्रकरणात साक्षीदार असलेला किरण गोसावी पुणे पोलिसांसमोर शरण येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून किरण गोसावी फरार असल्याचं बोललं जात होतं. किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने लावलेले सर्व आरोप किरण गोसावी याने फेटाळले आहे. आपल्याला धमकीचे फोन येत असल्याचं किरण गोसावी याने म्हटलं आहे.

या प्रकरणात अनेक मोठ्या नावांचा सहभाग असल्याचं किरण गोसावी याने म्हटलं आहे. ड्रग्स केस दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही किरण गोसावी याने केला आहे.

ड्रग्स केस प्रकरणाशी संबंध

एनसीबीने मुंबई ड्रग्स केस उघड केल्यानंतर किरण गोसावीचे आर्यन खानसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. किरण गोसावी याचे एनसीबीशी संबंध नसताना एनसीबीने कारवाई केल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानबरोबर कसा असे प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. गोसावी हा या प्रकरणात पंच साक्षीदार असल्याचं एनसीबीने स्पष्ट म्हटलं होतं. आर्यननसोबत त्याने काढलेला सेल्फीही व्हायरल झाला आहे.

प्रभाकर साईलचा आरोप

अभिनेता शाहरुख खानच मुलगा आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक खुलासा किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केला आहे. प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी वानखेडेंना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे. किरण गोसावीच्या सांगण्यावरून साईलने 50 लाख रुपये कलेक्ट केल्याचा खुलासा त्याने केला आहे. या 50 लाखांतले 38 लाख रुपये सॅम डीसोझाला दिल्याचा दावा देखील प्रभाकर साईल याने केला आहे.

संबंधित पोस्ट

पर्यटन क्षेत्रातील उद्योजिकांच्या सक्षमीकरणासाठी नवी कर्ज योजना- पर्यटन मंत्री गिरीश महाजन

vishwatmaklokswamivarta

जी एस टी  परतावा आणि महाराष्ट्राला केंद्राकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हैसूरमध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका मेगा कार्यक्रमात वाघांच्या गणनेची ताजी आकडेवारी जाहीर करणार

चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून घाटकोपर येथे आंदोलन!,चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा – हिंदु राष्ट्र समन्वय समिती  

vishwatmaklokswamivarta

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा; महागाईचा भडका उडण्याची शक्यता…

भारत-मॉरिशस भागीदारी चिरायू होईल- मॉरिशसचे पंतप्रधान डॉ.रामगुलम

vishwatmaklokswamivarta