vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षाचे आझाद मैदानात निदर्शने आंदोलन

*समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षाचे आझाद मैदानात निदर्शने आंदोलन*

 

मुंबई प्रतिनिधी – एनसीबीचे कर्तबगार प्रामाणिक अधिकारी समीर वानखेडे यांच्या समर्थनासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांच्या नेतृत्वात आज दि.27 ऑक्टोबर रोजी मुंबईत आझाद मैदान येथे निदर्शने आंदोलन करण्यात आली. या मोर्चाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर जिल्हाध्यक्ष संजय पवार कामगार नेते प्रकाश जाधव जिल्हाध्यक्ष हरिहर जाधव जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे वैशालीताई संगारे सो ना कांबळे, सचिन आठवले, नामदेव सरवदे, शिरीष चिकलकर विजय शेट्टी सुमित वजाळे रवि गायकवाड विजय वाघमारे,भागन गायकवाड आदी उपस्थित होते

 

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर नाही. मात्र ते मागासवर्गीय अधिकारी असल्याने त्यांना टार्गेट केले जात आहे. ड्रग्स च्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे काम एनसीबी चे अधिकारी समीर वानखेडे करीत आहेत.त्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचू नये; मागासवर्गीय अधिकाऱ्यांच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष ठामपणे उभे आहे.त्यामुळे समीर वानखेडे यांच्या समर्थनासाठी रिपब्लिकन हा मोर्चा काढण्यात आला.

संबंधित पोस्ट

सातारा नगर परिषद प्रकल्पांचा आढावा**पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडांना मीटर बसवावेत- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती· 2024-25 मध्ये देशाच्या 40 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात· गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक….

हिमाचल प्रदेशातील महिलांनी हाती बनवलेल्या पारंपारिक पहाडी वेशभूषा ‘चोल-डोरा’ परिधान करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पोहचले केदारनाथ च्या दर्शनाला

vishwatmaklokswamivarta

इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाला भारताचा पाठिंबा; केरळमधील महिलांनी जाळले हिजाब

vishwatmaklokswamivarta

निर्धाराला सलाम : ‘अशा हल्ल्यांना घाबरणार नाही, काहीही झालं तरी कर्तव्य बजावत राहणार’