vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पेट्रोल डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ…

पेट्रोल डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ…

मुंबई प्रतिनिधी : पेट्रोल डिझेलच्या किंमती महिन्याभरात वेगाने वाढत असून अद्याप कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर प्रत्येकी ३५ पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर १०८.६४ रुपये तर डिझेल ९७.३७ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे.

सध्या मुंबईत पेट्रोलचे दर ११४.४७ रुपये तर डिझेल १०५.४९ रुपये इतके आहेत. चेन्नईत पेट्रोल १०५.४३ रुपये तर डिझेल १०१.५९ रुपये दराने विक्री होत आहे. कोलकात्यात १०९.१२ रुपये दराने पेट्रोल तर १००.४९ रुपये दराने डिझेलची विक्री होत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती सर्वाधिक भोपाळमध्ये आहेत. तिथे पेट्रोल ११७.३५ रुपये प्रति लिटर तर डिझेल १०६.७६ रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.

गेल्या महिन्यात २८ तारखेला पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २५ पैशांनी महाग झाले होते. तेव्हापासून आतापर्यंत २० वेळा इंधन तेलांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. कच्च्या तेलांच्या किंमती 86 डॉलरवर पोहचल्या होत्या. २०१४ नंतर या उच्चांकी पातळीवर आहेत. यामुळेच सर्व पेट्रोलियम उत्पादने महाग होत आहेत. पेट्रोलच्या किंमती गेल्या महिन्याभरात ७.७५ रुपये प्रति लिटर वाढल्या आहेत. तर डिझेलच्या दरात ८.४५ रुपयांची वाढ झाली आहे.

संबंधित पोस्ट

भारतीय संगीत क्षेत्राच्या जागतिक विस्तारात स्पॉटीफाय सहाय्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खातेवाटपाचा तिढा सुटला? अर्थ खातं राष्ट्रवादीकडेच, अजित पवारांच्या 90 टक्के मागण्यांवर एकमत; सूत्रांची माहिती

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मदत करणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील ‘मिनी सरस-२०२५ प्रदर्शनास’ भेट

vishwatmaklokswamivarta

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी..बिनचूक व पारदर्शी होण्यासाठी प्रयत्न करावे- विभागीय आयुक्त पी. वेलरासू

संजय राऊत यांचे बंधू दिल्लीत पोहोचले ? जामीन मिळण्यासाठी प्रयत्न राज्यात चर्चेला उधाण..

vishwatmaklokswamivarta