
राष्ट्रीय एकता दिवस: अमित शहांनी वाहिली लोहपुरुष सरदार पटेलांना आदरांजली
गुजरात प्रतिनिधी
केवडिया: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुजरातमधील केवडिया याठिकाणी पोहोचले आहेत. तिथे त्यांनी सर्वांत आधी सरदार पटेल यांचा सर्वांत उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला वंदन केलं.
या कार्यक्रमामध्ये भारतीय हॉकी टीमचे कप्तान मनप्रीत सिंह यांच्या व्यतिरिक्त तिन्ही सैन्य दलाचे अधिकारी तसेच ऑलिम्पिकमधील वेगवेगळ्या खेळात पदकांची कमाई केलेले खेळाडू देखील उपस्थित आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी एका रेकॉर्डेड व्हिडीओच्या माध्यमातून संबोधन करणार आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये जी-20 शिखर संमेलनामध्ये सहभागी असल्याने या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीयेत.



