
या दशक कात उत्तराखंडचं, 100 वर्षात आले नाहीत एवढे भाविक पुढच्या 10 वर्षात येतील : मोदी
प्रतिनिधी उत्तराखंड :पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री पुष्कर सिंह थामी, कॅबिनेट मंत्री हरक सिंह आणि सुबोध उनियाल यांनी तेथील परिस्थितीचा, विकासकामांचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने केदार घाटीमध्ये सुरक्षा वाढवली आहे.
Kedarnath: पंतप्रधान नरेंद्र मोदी पाचव्यांदा केदारनाथच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. त्यांच्या केदारनाथ दौऱ्यात ते पावणे चारशे कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये सरस्वती आणि मंदाकिनी नद्यांच्या काठावर सुरक्षा भिंतीसह आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे उद्घाटन, मंदाकिनीवरील पूल आणि तीर्थक्षेत्रातील पुजार्यांसाठी निवासस्थाने, तसेच इतर अनेक पुनर्निर्माण कामांची पायाभरणी यांचा समावेश आहे. यासोबतच केदारनाथ धाममध्ये चार गुहाही तयार करण्यात आल्या आहेत. उत्तराखंड राज्य सरकारने या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी केली आहे.



