vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यातील अनेक जिल्ह्यात लाल परीची सेवा ठप्प; कर्मचाऱ्यांनी पुकारला संप..

राज्यातील अनेक जिल्ह्यात लाल परीची सेवा ठप्प; कर्मचाऱ्यांनी पुकारला संप…

महाराष्ट्र प्रतिनिधी :  राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमधील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुणे, नागपूर, अमरावती, सागली, जालना या जिल्ह्यांमध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे.

अमरावती

अमरावती जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती मध्यवर्ती बसस्थानक बंद असून बसस्थानाकातून केवळ मोजक्याच बस सुरू आहेत.

अमरावतीसह जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा, मोर्शी, आणि वरूड आगार बंद आहेत. बंद मध्ये 1500 पेक्षा अधिक कामगार सहभागी झाल्याची माहिती मिळत असून जिल्ह्यातील 350 बस पैकी केवळ 60 ते 70 बस रस्त्यावर धावत आहेत. ऐन दिवाळीच्या सणात बंद पुकारल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

जालना

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी अंबडमधील एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.

सांगली

जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद असून सांगली मिरज मध्ये एसटी सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात संपाचा परिणाम दिसून येत आहे.

पुणे

पुणे जिल्हात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापूरमधील डेपो बंद करण्यात आले

उद्या पुणे शहरातील स्वारगेट ,शिवाजीनगर ,भोर ,बारामती बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उस्मानाबाद

उस्मानाबादेत एस.टी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कळंब वगळता जिल्ह्यातील एक ही बस डेपोबाहेर आली नाही.

संबंधित पोस्ट

राज्यातील टेट’ परीक्षेचा निकाल आता १५ दिवसांत जाहीर होणार…एप्रिल-मेमध्ये ३२,३०० शिक्षकांची भरती

मुंबई महानगर पालिकेचे घरोघरी क्षय सर्वेक्षण,कोरोनासह ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका कायम असताना पालिकेने इतर गंभीर आजारांवरही लक्ष केंद्रित 

vishwatmaklokswamivarta

रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा.शहर काँग्रेस कमिटी तर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन.

खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यास राज्य शासन कटिबद्ध – अग्रिम निधी वितरित

vishwatmaklokswamivarta

पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांसाठी खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची सूचना गृह राज्यमंत्री योगेश कदम

vishwatmaklokswamivarta

मुंबईत 27,28 जानेवारीला ‘या’ परिसरात पाणी पुरवठा राहणार पुर्णपणे बंद….

vishwatmaklokswamivarta