vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा.शहर काँग्रेस कमिटी तर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन.

 रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा.शहर काँग्रेस कमिटी तर्फे पोलीस आयुक्तांना निवेदन…

 

राज्य प्रतिनिधी

औरंगाबाद – औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी काँग्रेसचे अध्यक्ष इब्राहिम पठाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना दुपारी एक वाजता निवेदन देण्यात आलेले आहेत.रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांनी मौजे पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक या ठिकाणी सप्ताहा दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल, असे जाणिवपूर्वक प्रवचन केले आहे.

भारतात एक कोटीपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम सोडला आहे. दहा-वीस वर्षे ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे. त्यांनी इस्लामचा सुक्ष्म अभ्यास केला असता, त्यांना यात अन्याय-अत्याचाराशिवाय काहीही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे. मोहम्मंद पैंगबर यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला. ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत, त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे? अशा स्वरुपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्ये रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट, ता. वैजापूर जि. औरंगाबाद यांनी केली आहेत. या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू-मुस्लिम या दोन समाजामध्ये मने कलुषित करुन जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगीरी महाराजाकडून मुस्लिम धर्मियांविरोधात जाणुनबुजुन धार्मिक भावना दुखवुन जातीय दंगल घडविण्याच्या इराद्यात व्यक्तव्य करून घेण्यात येत असल्याचे समजते. तसेच नितेश राणे हा सुध्दा दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवावा म्हणून जाणुनबुजुन चिथावणीखोर भाषण करत आहे. मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इज्तेमा होतात त्यामध्ये फक्त इस्लाम विषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणुन कसे जगावे याबाबत शिकवण दिली जाते. कोणत्याही

धर्म व जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्ये केली जात नाही.

भामट्या रामगीरी महाराजाने केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा, सामाजिक बंधूभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. सध्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्यामुळे आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगीरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट, ता. वैजापूर जि. औरंगाबाद यांच्या विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, नसता शहर काँग्रेस कमिटीचे लोकशाही मार्गाने मोर्चे, निदर्शने, आंदोलन करण्यात येईल.

इब्राहिम पठाण मा. अध्यक्ष

औरंगाबाद शहर जिल्हा कांग्रेस कमिटी, डॉक्टर जफर अहेमद, हमाद चाऊस, अकेब रझवी, शेख कैसर बाबा,पवन डोंगरे, दिपाली मिसाल, मोहम्मद जाकेर, शेख अथर, इरफान पठाण, मुजफ्फर खान पठाण, नगमा सिद्दिकी, अमीर अब्दुल सलीम,DR Sartej

संबंधित पोस्ट

दोन प्रकरणात न्याय मिळाला पुढे ही न्याय मिळेल, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ  यांना गणपती बाप्पा पावला

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांकडून शिवाजी चौकातच ठिय्या आंदोलन करण्याचे आवाहन

जिल्हा प्रशासनाचा स्टेट बॅंकेच्या सहकार्याने उपक्रम;जि.प.शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तकांचे मोफत वाटप..

vishwatmaklokswamivarta

जागतिक एड्स दिननिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजनसमानतेने जगण्याचा संदेश

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta