
नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामावर ऐरोलीत पालिकेची तोडक कारवाईसुरु…
वाशी : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात वाढणाऱ्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ऐरोली सेक्टर ९ येथील दिवागावमध्ये सहदेव अपार्टमेंटजवळ जी प्लस दोनचे बांधकाम करण्यात येते होते. पालिकेची परवागनी न घेता न घेता सुरू असलेल्या कामाला नोटीस बजावली होती. परंतु त्यांनी बांधकाम सुरूच ठेवल्याने अतिक्रमण विभागाने पोलिस बंदोबस्तामध्ये कारवाई करत बांधकात निष्कासित केले. सेक्टर ७ ऐरोली येथील पवन मिल्क सेंटर, पवन सुपर बाजार यांच्या दुकानांबाहेरील मार्जिनल स्पेसमधील जागेत सामान ठेवण्यात आले होते. त्यावरही महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. धडक मोहिमेसाठी ५ मजूर, १ गॅस कटर, २ इलेक्ट्रीक हॅमर, पीकअप व्हॅन या साधनांसह जी विभाग ऐरोली येथील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस पथक तैनात होते.



