vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

भूमिहीन, नावावर सातबारा नसलेल्या महिलांनाही मिळणार ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळखनांदेड जिल्ह्यात ६९ हजार महिलांची महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी

भूमिहीन, नावावर सातबारा नसलेल्या महिलांनाही मिळणार ‘महिला शेतकरी’ म्हणून अधिकृत ओळखनांदेड जिल्ह्यात ६९ हजार महिलांची महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी

 

नांदेड (जिm प्रतिनिधी ३ : नांदेड जिल्ह्यात शेती व शेतीपूरक व्यवसायामध्ये महिलांचा मोठा सहभाग असून, शेतीशी संबंधित कामांमध्ये प्रत्यक्ष योगदान देणाऱ्या महिलांना अधिकृत ओळख मिळावी तसेच कृषीविषयक शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे, यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ६९ हजार महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी दिली आहे.

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी कृषी विभागाने १७ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. महिलेच्या नावावर जमीन असणे हा एकमेव निकष नसून, शेती व शेतीपूरक व्यवसायात प्रत्यक्ष सहभागाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे भूमिहीन महिला, नावावर सातबारा नसलेल्या महिला, भाडेपट्ट्याने किंवा बटाईने शेती करणाऱ्या महिला, शेतमजूर, रोपमळा मजूर तसेच पशुचारक महिलांचाही या व्यापक संकल्पनेत समावेश करण्यात आला आहे.

 

शेतीपूरक व्यवसायात कार्यरत महिलांचाही समावेशग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रातील १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आणि शेती व्यवसायात प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या महिलांना या प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो. यामध्ये पीक उत्पादन व लागवड, बीजोत्पादन, भाजीपाला उत्पादन, फलोत्पादन व पुष्पोत्पादन, पशुपालन व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उत्पादन, कृषी-वनीकरण, अळंबी उत्पादन, गांडूळखत व कंपोस्ट निर्मिती, कृषीमाल प्रक्रिया व मूल्यवर्धन आदी शेती व शेतीपूरक उपक्रमांचा समावेश आहे.शासकीय योजनांचा लाभ घेणे होणार सुल

महिला शेतकरी म्हणून अधिकृत नोंदणी झाल्यामुळे कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये महिलांची ओळख सुलभ होण्यास मदत होणार आहे. कृषी कर्ज, कृषी निविष्ठा, पीकविमा, शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, कृषी विस्तार सेवा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी हे प्रमाणपत्र उपयुक्त ठरू शकते. तथापि, संबंधित योजनेच्या स्वतंत्र पात्रता व नियम लागू राहतील.

ऑनलाइन अर्जाची सुविधा

महिला शेतकरी प्रमाणपत्रा5


साठी कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्जासाठी आधार क्रमांक, जिल्हा, तालुका, गाव, मोबाईल क्रमांक तसेच कृषी कार्याचा प्रकार आदी माहिती भरावी लागते. उपलब्ध असल्यास कुटुंबातील सदस्याचा फार्मर आयडी जोडून त्याची पडताळणी करता येते.

 

अर्ज करण्यासाठी कृषी विभागाच्या https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service/ या अधिकृत महिला शेतकरी पोर्टलला भेट द्यावी. अप्लाय नाऊ (Apply Now) निवडून आधार क्रमांक व ओटीपीद्वारे पडताळणी करावी.

वैयक्तिक तसेच शेती/कृषी कार्याची माहिती भरावी. उपलब्ध असल्यास फार्मर आयडी जोडून पडताळणी करावी. भरलेली माहिती तपासून अर्ज सबमिट करावा. अर्ज करताना अडचण आल्यास किंवा मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यास संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

**********

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणुकांची घोषणा. भारतीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १८ जूनला मतदान होणार असून, २२ जूनला मतमोजणी होईल. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभरातील १,०२८ केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्यात आली

लोकसंवाद २०२६ कार्यक्रमात स्पर्धा परीक्षा व रोजगाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याची ७०.६६ टक्के मतदार गणनापत्र डिजिटायझेशन;• खामगाव विधानसभा मतदारसंघ अव्वल• गृहभेटीची मोहीम ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

संभाव्य पूरस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आणि सज्ज- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आढावा बैठकीत दिला विश्वास

प्रशासकीय सेवा थेट जनतेच्या दारी; ‘महाराजस्व समाधान शिबिर’ नागरिकांचे जीवन सुकर करेल– अपर मुख्य सचिव विकास खारगे*