vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या आवश्यक तांत्रिक कामांसाठी दिनांक 5 ते 7 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या आवश्यक तांत्रिक कामांसाठी दिनांक 5 ते 7 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार.

 

जालना प्रतिनिधी-जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेच्या आवश्यक तांत्रिक कामांसाठी दिनांक 5 ते 7 ऑक्टोबर 2026 या कालावधीत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार. शटडाऊन कालावधी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर काटकसरीने करुन पाण्याचाअपव्यय टाळावा- आयुक्‍त, जालना शहर महानगरपालिका

जालना शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्‍यात येते की, जालना शहर महानगरपालिकेमार्फत जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पैठण व अंबड येथील पंपिंग स्टेशनमधील जुने पंप काढून त्याऐवजी नवीन पंप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सदर काम सुरक्षितरित्या व तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित पंपिंग स्टेशनचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे.

तसेच, नवीन 35 MLD जलशुद्धीकरण केंद्रातून येणारी 900 मि.मी. व्यासाची शुद्ध पाण्याची वाहिनी जुन्या पंपिंग स्टेशनच्या 900 मि.मी. व्यासाच्या विद्यमान पाणीपुरवठा वाहिनीला जोडण्याचे कामही करण्यात येणार आहे. या कामासाठी संबंधित पाणीपुरवठा वाहिनीचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे.

उपरोक्त सर्व कामे एकाच कालावधीत पूर्ण करून पाणीपुरवठा यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने दिनांक 05/10/2026 ते दिनांक 07/10/2026 या तीन दिवसांच्या कालावधीत सलग शटडाऊन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्यामुळे सदर कालावधीत जालना-जायकवाडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जालना शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. परिणामी, नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगीर आहे.

तरी जालना शहरातील सर्व नागरिकांनी सदर शटडाऊन कालावधी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

000

—

संबंधित पोस्ट

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेपरफूट, परीक्षा गैरप्रकार रोखणार संदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार

जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सोमवारीअमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली

टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले-महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची सर्व विकासकामे विहित मुदतीत, गुणवत्तापूर्ण करा – मंत्री गिरीश महाजन