vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

वसुंधरा पायी दिंडी २०२६’चा पर्यावरण संवर्धनाचा संदेश ठाण्यात ५ ऑक्टोबरला आगमन

‘वसुंधरा पायी दिंडी २०२६’चा पर्यावरण संवर्धनाचा संदेश ठाण्यात ५ ऑक्टोबरला आगमन

ठाणे – प्रतिनिधी –

जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी यांच्या प्रेरणेने पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, वृक्षारोपण, सामाजिक बांधिलकी आणि जनजागृतीचा संदेश घेऊन ‘वसुंधरा पायी दिंडी २०२६’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई (वसई) ते श्रीक्षेत्र नाणीजधाम असा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करणारी ही दिंडी ४ ऑक्टोबर रोजी उपपीठ मुंबई, विरार–शिरसाड येथून प्रस्थान करणार असून, ५ ऑक्टोबर रोजी ठाणे शहरातून मार्गस्थ होणार आहे.

महाराष्ट्रातील विविध उपपीठांसह मुंबई परिसरातून हजारो भाविक या दिंडीत सहभागी होणार आहेत. दिंडीच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण, स्वच्छता, वृक्षारोपण तसेच समाजाप्रती असलेली जबाबदारी याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

ठाणे परिसरातील प्रवासादरम्यान दिंडीच्या माध्यमातून विविध सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता घोडबंदर रोड येथील क्रियान बँक्वेट हॉल येथे दिंडीचा दुपारचा थांबा, तर रात्री ७.३० वाजता विटावा येथील पऱ्याचे मैदान, श्री कृष्ण मंदिर येथे रात्रीचा मुक्काम असणार आहे.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणाऱ्या या अनोख्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, उपपीठ मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

शांती मंत्र “ महत्व 

अंतगड सूत्रवाचनातून पर्युषण पर्वाला मंगलमय सुरुवात-आत्मशुद्धी, कर्मनिर्जरा, तप-त्याग आणि क्षमाभावाचा संदेश; आठ दिवस विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची निवड 

vishwatmaklokswamivarta

💐☘️*धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा* ☘️💐आज उत्साह, आनंद आणि रंगांची उधळण करणारा सण *रंगपंचमी* !

मनुष्यता जपणाऱ्यालाच मिळते खऱ्या जीवनाची श्रीमंती; महासतींचे प्रतिपादन…

गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.