vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अंधश्रद्धा निर्मूलन भूषण पुरस्काराने संदीप गोवळकर सन्मानित…

अंधश्रद्धा निर्मूलन भूषण पुरस्काराने संदीप गोवळकर सन्मानित…

खेड, प्रतिनिधी अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरीचे प्रधान सचिव संदीप गोवळकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन भूषण पुरस्कार २०२६ देऊन गौरविण्यात आले.

कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा खेड ग्रामीण, खेड युवा ग्रामीण व खेड महिला ग्रामीण यांच्या वतीने संघाच्या १०६ व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच शिक्षण महर्षी तु. बा. कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिरलोटे येथे आयोजित कार्यक्रमात गोवळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

संविधान जागृती, अंधश्रद्धा, बुवाबाजी व कर्मकांडांविरोधात जनजागृती करत वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवादी विचार आणि सामाजिक समतेचा संदेश समाजात पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या गौरवाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

 

संबंधित पोस्ट

माजी सैनिकांनी हयातीचे दाखले बँकेत सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

खामगाव शासकीय वसतिगृहासाठी पाणीपुरवठा निविदा आमंत्रित 

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्ष स्थापन

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे ; पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा

शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या दिशेने राज्य शासन प्रयत्नशील- पणन मंत्री जयकुमार रावल

एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी