vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

१८० विमान प्रवाशांचे प्राण वाचवणारे शूर वैमानिक श्री. स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांच्या निवासस्थानी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिली सदिच्छा भेट

१८० विमान प्रवाशांचे प्राण वाचवणारे शूर वैमानिक श्री. स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांच्या निवासस्थानी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिली सदिच्छा भेट

मुंबई प्रतिनिधी-

१८० विमान प्रवाशांचे प्राण वाचवणारे शूर वैमानिक श्री. स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांच्या निवासस्थानी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिली सदिच्छा भेट कॅप्टन श्री. स्मित मच्छार यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी, दीर्घायुष्यासाठी व्यक्त केली सदिच्छा

🔷आकाशात ३५ हजार फुटांवर कॉकपिटमध्ये सह-वैमानिकाकडून झालेल्या प्राणघातक चाकूहल्ल्यात गंभीर जखमी असतानाही, अतुलनीय शौर्य दाखवून २७ निष्पाप बालकांसह तब्बल १८० प्रवाशांचे प्राण सुखरूप वाचवणारे फ्लाय दुबईचे धाडसी पायलट, मूळ मुंबईकर असणारे कॅप्टन श्री. स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांची मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी आज (दिनांक ४ ऑक्टोबर २०२६) भेट घेतली.

🔷मुंबईतील घाटकोपर (पूर्व) येथील ‘धवलगिरी’ इमारतीत वास्तव्यास असणारे कॅप्टन श्री. स्मित यांचे चुलते श्री. किशोर मच्छार यांच्या निवासस्थानी जाऊन महापौरांनी भेट घेतली. त्यावेळी श्री. स्मित यांच्या प्रकृतीची माहिती घेत आस्थेने विचारपूस केली. श्री. स्मित यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही केली.

🔷विशेष म्हणजे, मच्छार कुटुंबीयांचे हे निवासस्थान ज्या प्रभागात येते, तो प्रभाग क्रमांक १३२ हा स्वतः महापौर श्रीमती रितू तावडे यांचा नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व असलेला प्रभाग आहे. आपल्याच नगरसेवक प्रभागातील आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या सुपुत्राच्या कुटुंबियांची भेट घेत महापौरांनी संपूर्ण प्रभाग आणि मुंबईकरांच्या वतीने मच्छार कुटुंबियांना पाठबळ दिले.

🔷याप्रसंगी आमदार श्री. पराग शाह, नगरसेवक श्री. धर्मेश गिरी, नगरसेविका श्रीमती राखी जाधव यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

🔷दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात ३० सप्टेंबर रोजी घडलेल्या जीवघेण्या प्रसंगात कॅप्टन श्री. स्मित मच्छार यांनी रक्ताच्या थारोळ्यात असतानाही असीम संयम दाखवत आणि विमानाचे यशस्वी इमर्जन्सी लँडिंग करून नवा इतिहास घडवला. त्यांच्या या धाडसाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील नेत्यांनी कौतुक केले आहे.

🔷या पार्श्वभूमीवर महापौर श्रीमती रितू तावडे यांनी मच्छार कुटुंबीयांशी संवाद साधत कॅप्टन श्री. स्मित यांच्या उपचारांची व प्रकृतीत होत असलेल्या सुधारणेची माहिती जाणून घेतली.

संबंधित पोस्ट

ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी राज्याच्या प्रतिनिधींची सविस्तर चर्चा

अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रिपब्लिकन पक्ष- खोरीप मुंबई महानगरपालिका निवडणूक 20 26 करिता पक्षाच्या उमेदवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न

धक्कादायक: न्यायासाठी महिलेचे आमरण उपोषण!गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून जीवितास धोका; प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची महिलेची मागणी..

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक #एसटी बससेवेचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा विषयक महत्त्वाची सूचना..

vishwatmaklokswamivarta