vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुकंपा तत्वावर पदभरती व पदोन्नती आदेशांचे वितरण,सामान्य प्रशासन विभागातील वर्ग-४ मधील तीन कर्मचारी यांना आरोग्य संवर्गातील वर्ग 3 पदावर पदोन्नती तसेच वर्ग-4 पदावर अनुकंपा तत्वावर पदभरती.

सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुकंपा तत्वावर पदभरती व पदोन्नती आदेशांचे वितरण,सामान्य प्रशासन विभागातील वर्ग-४ मधील तीन कर्मचारी यांना आरोग्य संवर्गातील वर्ग 3 पदावर पदोन्नती तसेच वर्ग-4 पदावर अनुकंपा तत्वावर पदभरती

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषद, ठाणेच्या सामान्य प्रशासन विभागातील वर्ग-४ मधील तीन शिपाई कर्मचारी यांना पदोन्नतीने आरोग्य संवर्गातील आरोग्य सेवक पुरूष या पदावर पदोन्नतीने नियुक्ती तसेच वर्ग 4 शिपाई पदावर अनुकंपा तत्वावर पदभरतीने नियुक्ती देण्यात आली. या अनुषंगाने पदभरती व पदोन्नती आदेशांचे वितरण आज, दि. ०५ ऑक्टोबर, २०२६ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते त्यांच्या दालनात करण्यात आले.

सेवाकाळात कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन पात्र वारसांना अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत संधी देण्यात येते. या माध्यमातून संबंधित कुटुंबाला आर्थिक आधार मिळण्यासोबतच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागण्यास मदत होते. सेवा संकल्प अभियानांतर्गत पात्र प्रकरणांवर आवश्यक कार्यवाही करून अनुकंपा पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

तसेच, जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे वर्ग-४ मधील तीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळातील पात्रता व नियमानुसार आरोग्य सेवक पुरूष वर्ग-३ पदावर पदोन्नती देण्यात आली. पदोन्नतीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेत पुढील जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा विभागाच्या कामकाजासाठी उपयोग होणार आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांना नवीन पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शासकीय सेवेत नागरिकांना दर्जेदार व वेळबद्ध सेवा देणे ही अधिकारी-कर्मचाऱ्यांची महत्त्वाची जबाबदारी असून, पदोन्नती नंतरही सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शकता यांना प्राधान्य देऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्याचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. शासनाच्या नियमांनुसार पात्र प्रकरणांमध्ये वेळेत कार्यवाही करून लाभार्थ्यांना आवश्यक सेवा-संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून कर्मचारी कल्याण, प्रशासकीय कार्यक्षमता आणि वेळबद्ध सेवा यांना प्राधान्य देत जिल्हा परिषद ठाणेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

०००

संबंधित पोस्ट

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टिळकनगर सह्याद्री क्रीडा मंडळाच्या गणेशोत्सवाला दिली भेट*

vishwatmaklokswamivarta

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन 

आदिवासी भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य द्यावे -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

vishwatmaklokswamivarta

डीजे’मुक्त उत्सव व्हायला हवा; पण धर्म, संस्कृती, उत्सव यांवरील टीका खपवून घेणार नाही !पुरोगामी टोळ्यांनी केवळ गणेशोत्सवातच नव्हे, तर ध्वनिप्रदूषण करणाऱ्या भोंग्यांविरुद्धही आवाज उठवावा!*

vishwatmaklokswamivarta

इतर मागासवर्गीयांसाठी विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अनिवार्य; योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्याचे आवाहन

रायगड जिल्ह्यात 15 दिवस ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत सूट-जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आदेश, शांतता क्षेत्रात सूट लागू नाही

vishwatmaklokswamivarta