vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांत सेवा संकल्प अभियानअंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांत सेवा संकल्प अभियानअंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर

जालना,द प्रतिनिधी : नागरिकांच्या विविध महसूलविषयक अडचणींचे स्थानिक पातळीवर निराकरण करण्याच्या उद्देशाने जालना जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांमध्ये ‘सेवा संकल्प अभियान’ उपक्रमांतर्गत महसुल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला

जिल्ह्यातील जालना, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा, परतूर, घनसावंगी आणि अंबड या आठही तालुक्यांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल कार्यालयांमध्ये वारंवार ये-जा करावी लागू नये, तसेच त्यांच्या प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

या शिबिरांमध्ये नागरिकांच्या विविध महसूलविषयक समस्या व अर्ज स्वीकारून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात आली. विविध दाखले, फेरफार नोंदी, जमीनविषयक प्रकरणे, वारस नोंदी तसेच महसूल विभागाशी संबंधित इतर कामांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या या शिबिरामुळे महसूल प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ होण्यास मदत झाली.

****

संबंधित पोस्ट

महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

अमृतचा ‘मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ सुरू; मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची संधी..

जिल्हा रुग्णालयाकडून ५५ मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

सातरगावात ‘एचपीव्ही’ लसीकरण विशेष सत्र उत्साहात

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी

नांदेड जिल्ह्यात १०६७ रुग्णांना सुमारे ०८.२१ कोटींची मदत ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती