vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही; संविधान बदलणाऱ्यांना बदलण्यासाठी मोदींसोबत मी उभा आहे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

 *संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही; संविधान बदलणाऱ्यांना बदलण्यासाठी मोदींसोबत मी उभा आहे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

 

सोमनाथ प्रतिनिधी  : संविधान बदलण्याचा प्रश्नच नाही. तरी काही लोक संविधान बदलले जाण्याची खोटी आवई उठवितात. संविधान बदलण्याची भाषा करण्यापेक्षा आपले मन बदला. संविधान बदलणाऱ्यांना बदलविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मी मजबूत उभा आहे.मोदी यांनी संविधानासमोर माथा टेकवून शपथ घेतली आहे.मोदी हे संविधान पूजक आहेत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. एक मत एक व्यक्ती एक मूल्य ही समता देणारे; जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही मजबूत करणारे भारतीय संविधान प्रत्येक भारतीयाला न्याय देणारे आहे. त्यामुळे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारतीय संविधान ठरले असून भारतीय संविधानामुळे जगातील सर्वश्रेष्ठ संसदीय लोकशाहीव्यवस्था भारतात असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

 

गीर सोमनाथ येथील प्रभास पाटण गावातील सभागृहात रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित सदभावना संमेलनात ना रामदास आठवले यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले.यावेळी रिपाइंचे गुजरात प्रदेश अध्यक्ष अशोककुमार भट्टी; आयोजक गुजरात रिपाइंचे सरचिटणीस चंद्रसिंह महिडा; रिपाइं चे गुजरात निरीक्षक जतीन भुट्टा; जयंतीभाई गडा; सोमनाथ मंदिर चे ट्रस्टी प्रा. जे डी परमार; जिल्हा अधिकारी गोहिल; जिल्हा विकास अधिकारी रवींद्र खताळे; राजेश गोयल; लिलाबेन वाघेला; तृष्णा व्यास ; विनोद जेठवा; मावजीभाई वाढेर; कलाबेन नरसिंह राणवा; परबत चौहान; विजयसिंह चावडा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

दुसऱ्याचे दुःख कमी करणे हीच खरी सदभावना आहे . सदभावनेमुळेच शांतता प्रगती साधता येईल. एकमेकांच्या धर्माचा आदर राखून आपल्या धर्माचे पालन करत मानवते चा सदभावनेचा विचार वृद्धिंगत करावा. गावागावात होणारे कलह मिटविण्यासाठी गावातील लोकांनी सदभावना वाढविणे महत्वाचे आहे. एकमेकांवर अन्यायाची भूमिका हिंसेची भूमिका घेऊ नये. दलितांवर महिलांवर होणारे अत्याचार रोखवेत त्यासाठी सदभावना मनामनात वाढविली पाहिजे त्यासाठी असे सदभावना संमेलन आयोजित करणे हा स्तुत्य उपक्रम असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

गीर सोमनाथ येथे बौद्धकालीन प्राचीन लेणी सापडल्या असून त्या लेण्यांचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकार च्या पुरातत्त्व खात्याशी आपण बोलणार असून याभागात श्रीलंकेतून बोधिवृक्षाची फांदी आणून येथे बोधीवृक्षांचे वन उभारण्याची मागणी चांगली असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान बुद्धांना मानतात. गुजरात च्या मुख्यमंत्री निवासस्थानी भव्य बुद्ध मूर्ती आहे. असे ना रामदास आठवले म्हणाले.

संबंधित पोस्ट

नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा-राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी २०२५ या नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta

15 ते 18 मे कालावधीत जिल्ह्यात यलो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचे स्मारक उभारणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर काम करावे- महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे,यंदा दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल

vishwatmaklokswamivarta

भारत – पोर्तुगाल पुनर्प्रस्थापित राजनैतिक संबंधांना ५० वर्षे पूर्ण महाराष्ट्रासोबत सहकार्य वाढविण्याबाबत पोर्तुगाल उत्सुक- राजदूत जोओ मॅन्युएल मेंडिस रिबेरो डी अल्मेडा

निबंध स्पर्धेमुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta