vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

*अनुदानित खतांचे आता मोबाईलवरून बुकिंग; जिल्ह्यात ‘एफएफएस’ प्रणाली लागू होणार**२२ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी; बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा*

*अनुदानित खतांचे आता मोबाईलवरून बुकिंग; जिल्ह्यात ‘एफएफएस’ प्रणाली लागू होणार**२२ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी; बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा*

गडचिरोली, प्रतिनिधी: जिल्ह्यातील खत विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी रब्बी हंगाम २०२६ मध्ये २२ ऑक्टोबरपासून ‘एफएफएस’ (फार्मर फर्टिलायझर सिस्टीम) ही डिजिटल प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाईलवरून अनुदानित खतांचे ऑनलाइन बुकिंग करता येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

शेतकऱ्यांनी Google Play Store वरून ‘FFS’ अ‍ॅप डाउनलोड करून स्वतःची नोंदणी करावी. नोंदणी करताना जमीन व पिकांची अचूक माहिती भरून आवश्यक अनुदानित खतांचे ऑनलाइन बुकिंग करावे.बुकिंग केल्यानंतर पुढील तीन दिवसांत शेतकरी किंवा त्यांचे प्रतिनिधी संबंधित कृषी सेवा केंद्रावर जाऊन खत खरेदी करू शकतील. प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी अ‍ॅपमधील ‘क्यूआर कोड’ अधिकृत खत विक्रेत्याला दाखवावा लागेल. त्यानंतर विक्रेत्यामार्फत खत विक्रीची डिजिटल नोंद केली जाईल. या व्यवस्थेमुळे खत खरेदीचे नियोजन सुलभ होऊन कृषी सेवा केंद्रांवरील गर्दी व प्रतीक्षेचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.

अ‍ॅप डाउनलोड करणे, ‘फार्मर आयडी’ तयार करणे, जमीन व पिकांची नोंद करणे किंवा ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेत अडचण आल्यास संबंधित तालुक्यातील गुणनियंत्रण निरीक्षक अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिक वापरास सक्त मनाई ; ध्वजसंहितेचे पालन करण्याचे आवाहन 

विशेष लेख -प्रशासनाला अधिक पारदर्शी करणारा माहितीचा अधिकार अधिनियम २००५

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगरसाठी मोठा निर्णय – साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी ₹१,२३४ कोटींच्या तरतुदीस मान्यता..

विदर्भ , मराठवाडा, तेलंगलना आणि आंध्रप्रदेश या ठिकाणांना एका सूत्रात बांधणाऱ्या तिरुपती -अकोला- तिरुपती या साप्ताहिक एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला आहे

अकोले पर्यटन विकास निधीत वाढ करा – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील -जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम जिल्हास्तरीय बैठक संपन्न 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकार ची सर्वात मोठी कारवाई दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ PDF मासिकांवर बंदी घालत ती जप्त करण्याचे आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta