vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

200 कोटींच्या खंडणीतील आरोपीसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसचा सेल्फी, चर्चांना उधाण

200 कोटींच्या खंडणीतील आरोपीसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसचा सेल्फी, चर्चांना उधाण

मुंबई प्रतिनिधी

२०० कोटींच्या खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीसचा सेल्फी समोर आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सेल्फी याच वर्षात एप्रिल-जून महिन्याच्या कालावधीत घेतला गेला आहे. याच कालावधीत चंद्रशेखर हा जामीनावर बाहेर होता.

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यात ४ वेळा चेन्नईत भेटीगाठी झाल्या असून यासाठी सुकेशने एका खासगी जेटची सोय केली होती.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये सुकेश चंद्रशेखर आरशासमोर सेल्फी घेताना जॅकलिनच्या गालावर किस करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या फोटोत सुकेशच्या हातात असलेल्या i phone 12 pro मध्ये इस्राइलचं सिमकार्ड टाकून त्याने खंडणी मागितली होती. जेलमध्ये असतानाही सुकेश हाच मोबाईल वापरत असल्याचं कळतंय.

सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लिना मारिया पॉल यांचा सहभाग असलेल्या २०० कोटींच्या खंडणीप्रकरणात ईडीने गेल्या महिन्यात जॅकलिनची सात तास चौकशी केली होती. दिल्ली पोलिसांनी आपल्या चार्जशीटमध्ये सुकेश चंद्रशेख आणि इतर १३ जणांवर Ranbaxy च्या प्रमोटर्सची २०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखरने तुझ्या पतीला लवकरच जेलमधून बाहेर काढतो असं सांगत तक्रारकर्त्याकडून २०० कोटी रुपये उकळले होते.

सुकेश चंद्रशेखरच्या वकिलांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जॅकलिन आणि सुकेश हे डेट करत होते. परंतू जॅकलिनने यानंतर स्पष्टीकरण देत आपण सुकेश चंद्रशेखरसोबत डेट करत असल्याचा आरोप फेटाळून लावला होता.

संबंधित पोस्ट

विशेष लेख -:अभिजात मराठी भाषा..जतन आणि संवर्धन

vishwatmaklokswamivarta

राजकारणातून समाजहित जपणारा नेता गमावला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली..

vishwatmaklokswamivarta

दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदानलोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४…

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैमध्ये मिळणार;शेतकऱ्यांनो, ई-केवायसी, आधार सीडिंग करा- कृषी विभागाचे आवाहन

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा पहिल्यांदाच खासगी कारसाठी रेल्वेद्वारे वाहतूक करण्याची सेवा सुरू