vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आज सकाळी नाशिक शहरातील टिळकवाडी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयापासून ग्रंथदिंडीला सुरुवात..

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, ग्रंथदिंडीने दुमदुमली कुसुमाग्रज नगर….

आज सकाळी नाशिक शहरातील टिळकवाडी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयापासून ग्रंथदिंडीला सुरुवात..

नाशिक प्रतिनिधी आम्हा घरी शब्दांचे धन, शब्दांचीच रत्ने अर्थात ग्रंथ हीच समृद्धी मानणाऱ्या संत आणि अन्य ज्येष्ठ लेखकांचे ग्रंथ पालखीतून सवाद्य सारस्वतांनी आपल्या खांद्यावर मिरवले आणि या ग्रंथ दिंडीने अवघी कुसुमाग्रज नगरी दुमदुमली. आज परंपरेने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात केली.

आज सकाळी नाशिक शहरातील टिळकवाडी येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. यावेळी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ तसेच कृषी मंत्री दादा भुसे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दोन पथक तसेच शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे पावसाळी वातावरण असूनही अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ग्रंथदिंडी सुरू झाली.

विविध दालनांची आणि प्रदर्शनाचे उद्घाटन संमेलन स्थळी म्हणजेच आडगाव येथील कुसुमाग्रज नगरी येथे होणार आहे.

नाशिकमध्ये ग्रंथ दिंडीतही ठाले पाटील यांची विलंबाने हजेरी -अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचे ग्रंथ दिंडी प्रसंगी अर्धा तास उशिराने आगमन झाले. आयोजकांच्या मनमानी कारभारामुळे त्यांनी दिंडीस येणे टाळण्याचा प्रयत्न केला, असे सांगण्यात येत आहे. मात्र आयोजकांनी फोनाफोनी करून त्यांना बोलावून घेतल्यानंतरच ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला.

संबंधित पोस्ट

कुकिंग होप : कर्करोगाशी सामना करणाऱ्या मुलांसाठी वरदान ठरणार..

vishwatmaklokswamivarta

आधुनिक चित्रनगरी उभारणीने नाशिकच्या आर्थिक, सांस्कृतिक विकासाला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार तज्ज्ञ सल्लागारांच्या अहवालानंतर व्यवहार्यता तपासून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

बृहन्मुंबई हद्दीत 4 डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेशचे जारी

vishwatmaklokswamivarta

सांगवी येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पर्यावरण संव्हर्धनासाठी संगम प्रतिष्ठाण चा अनोखा उपक्रम गुढीपाडवा चा

नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाहिरातींचे पूर्वप्रमाणन आवश्यक; जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती स्थापन – रणजितसिंह राजपूत

vishwatmaklokswamivarta