vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पर्यावरण संव्हर्धनासाठी संगम प्रतिष्ठाण चा अनोखा उपक्रम गुढीपाडवा चा

मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पर्यावरण संव्हर्धनासाठी संगम प्रतिष्ठाण चा अनोखा उपक्रम गुढीपाडवा चा

मुंबई प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत , चैत्र शुक्ल गुढीपाडव्याच्या अक्षय मुहूर्तावर मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यातील एम.पश्चिम विभागातील म्हैसूर कॉलनी चेंबूर स्थित सुका कचरा वर्गीकरण केंद्रावरील कचरावेचक महिलांनी स्वच्छ भारत अभियानाच्या पूर्व संध्येला चैत्र शुक्ल गुढीपाडवा आणि नववर्षाचे औचित्य साधून,सुक्या कचऱ्यातील रंगीबेरंगी प्लास्टिक,कचरा,पुठ्ठा,पेट बॉटल,टेट्राप्याक,थर्माकोल,टायर,टिन डब्बा आणि तत्सम प्रकाराची टाकाऊ बांबू मध्ये गुंफण करून कचऱ्याच्या गाठाणवर गुडी उभी करून,या आपल्या मुंबई नगरीतील क्षेपणभूमीवर जाणारा कचरा हा कचरा नसून काचारावेचकांची रोजी रोटी तर आहेच, परंतु भविष्यात क्षेपणभूमीवरील ताण कमी करायचा असेल तर आपल्या घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करून **माझा कचरा माझी जबाबदारी**या अभियानाला मुंबईकरांनी प्रोत्साहन देऊन ,स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये आपल्या मुंबईचा अव्वल क्रमांक यावा यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केले आहे.

गेली 8 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या जी.उत्तर,एफ.उत्तर आणि एम.पश्चिम विभागात घन कचरा व्यवस्थापन खात्यात सुका कचरा वर्गीकरण केंद्र **संगम प्रतिष्ठाण** या काचारावेचकांच्या कल्याणकारी योजनांसाठी कार्यरत संस्थेच्या सचिव कोमल तानाजी घाग यांच्या संकल्पनेतून ही पर्यावरण पूरक गुढी उभारली गेली होती. येत्या वर्षात जास्तीत जास्त सुका कचरा अडवून क्षेपणभूमीवर जाणारा कचरा कमी करण्यासाठी ,संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत जनजागृती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली ।

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्ती साठी मंत्रालयावर झोपडीधारकांचा संकल्प मोर्चा..

vishwatmaklokswamivarta

वारणा धरणात 29.25 टी.एम.सी. पाणीसाठाकोयना धरणातून 42 हजार 100 तर वारणा धरणातून 8 हजार 92 क्युसेक्स विसर्ग..

आरोग्यविषयक सर्वेक्षणाची माहिती-देवून सहकार्य करण्याचे आवाहन.

vishwatmaklokswamivarta

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात-दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी इंडियाटूरिझम मुंबईच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात घेतला सहभाग