vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश…..

महाराष्ट्र राज्यातील 175 पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती; मुंबईतील 57 जणांचा समावेश…..

मुंबई प्रतिनिधी :मुंबई : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राज्यातील गृहमंत्रालयाने पोलिसांच्या पदोन्नतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 175 वरिष्ट पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. संबंधित वरिष्ट पोलीस निरीक्षकांना आता सहाय्यक पोलीस आयुक्ताची जबाबदारी देण्यात येणार आहे. सोबतच त्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. मुंबईच्या विविध पोलीस विभागातील 57 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.

मुंबईतील 57 जणांचा समावेश

दरम्यान मुंबईमधील ज्या पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे, त्यातील अनेकांची बदली न करता त्यांना मुंबईमध्येच ठेवण्यात आले आहे. आता लवकरच या अधिकाऱ्यांना त्यांची नवीन जबाबदारी मिळणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात आली. राज्यातील 175 वरिष्ट पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे. ज्या पोलीस निरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे, त्यांच्याकडे आता सहाय्यक पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वोपवण्यात येणार आहे. यामध्ये मुंंबईमधील 57 जणांचा समावेश असल्याचे गृहमंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

‘यांना’ मिळाली पदोन्नती

पदोन्नती मिळालेल्या पोलीस अदिकाऱ्यांमध्ये मुंबईतील शाम शिंदे, साहेबराव सोणवने, शरद ओवले, दिनकर शिलांवत, सुधीर करलेकर, जयंत परदेशी, किशोर गायक, सुहास हेमाडे, सुनिल घुगे, धर्मपाल बनसोडे, हरिष गोस्वामी, दीपक निकम, संजय जगताप, राजू कसबे यांच्यासह 57 जणांचा समावेश आहे. लवकरच त्यांच्याकडे सहाय्यक पोलीस आयुक्ताची जबाबदारी स्वोपवण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे दि.08 ते 14 एप्रिल या कालावधीत आयोजन

जालन्यात मोकाट कुत्रे व नागरी समस्यावर शिवसेना आक्रमक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्वात उग्र आंदोलनभवानीनगर येथे मोकाट कुत्र्यांनी तोडले चिमुकल्याचे लचके..

vishwatmaklokswamivarta

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीसाठी ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मुदतवाढ – शालेय शिक्षण विभागाची माहिती

जिल्ह्यात दि.10 मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

वृद्धांच्या समस्या वृद्धच सोडविणार,आंतरराष्ट्रीय वृध्द अभ्यासक प्रकाश बोरगावकर यांची ” वृध्द ते वृध्द ” संकल्पना

vishwatmaklokswamivarta

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल

vishwatmaklokswamivarta