vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

वृद्धांच्या समस्या वृद्धच सोडविणार,आंतरराष्ट्रीय वृध्द अभ्यासक प्रकाश बोरगावकर यांची ” वृध्द ते वृध्द ” संकल्पना

वृद्धांच्या समस्या वृद्धच सोडविणार,आंतरराष्ट्रीय वृध्द अभ्यासक प्रकाश बोरगावकर यांची ” वृध्द ते वृध्द ” संकल्पना

 

रमेश औताडे , मुंबई

मुंबई प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यांच्या समस्या वाढत आहेत. काही ज्येष्ठ नागरिक सधन आहेत पण वेळ कसा घालवायचा ही त्यांच्यासमोर समस्या आहे. तर दुसरीकडे असे ज्येष्ठ नागरिक आहेत की ते गरजू, निराधार व अंथरुणाला खिळले आहेत. या दोन्ही विरुद्ध टोकाच्या समस्यांचा अभ्यास ज्येष्ठ नागरिकांचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक प्रकाश बोरगांवकर यांनी ” वृध्द ते वृध्द ” वृद्धांचे प्रश्न वृध्दच सोडविणार हि नवीन संकल्पना सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

ज्यांच्याकडे आहे व ज्यांच्याकडे नाही अशांना एकत्र आणून एकमेकांना मदत करणे व आनंद देणे हाच उद्देश या संकल्पनेच्या मागे आहे.

श्रीमंत सधन वृद्ध आपल्या वेळेचा गरीब वृद्ध गरजुंच्या भेटी गाठी घेणे , त्यांची विचारपूस करणे , त्यांच्या सोबत बसून गप्पा मारणे , विनोद सांगणे , भावनिक साद घालत त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी करून देणे , जमले तर अन्न वस्त्र निवारा या गरजा भागविण्यासाठी ” आपण समाजाचे काही देणं लागतो ” या भावनेतून मदत करणे , असे अनेक उपक्रम या संकल्पनेत आहेत. असे प्रकाश बोरगांवकर यांनी ” वृध्द ते वृध्द ” या संकल्पाने विषयी बोलताना सांगितले.

 

याची सुरुवात म्हणुन त्यांनी अंधेरी येथील

” आजी ” वृद्ध नागरिक सेवा केंद्र या संस्थेत अभिनेत्री शमिता शेट्टीचा वाढदिवस सधन वृद्ध मंडळी घेऊन साजरा केला. शमिता ने तिच्या वडीलांच्या आठवणी सांगत सर्व वृद्ध मंडळी सोबत संवाद साधला. ” वृध्द ते वृध्द ” ही संकल्पना शमिताला आवडली असून या संकलपणेचा ती प्रचार व जनजागृती करणार आहे. असे बोरगावकर यांनी सांगितले.

ज्यांच्याकडे आहे व ज्यांच्याकडे नाही अशांना एकत्र आणून एकमेकांना मदत करणे व आनंद देणे हाच आमचा उद्देश आहे. असे निरनिराळे कार्यक्रम आम्ही भविष्यात करू, असे प्रकाश नारायण बोरगांवकर सांगितले.

.

संबंधित पोस्ट

सस्ती अदालत उपक्रमासाठी तालुकास्तरीय समितीची स्थापना-विभागीय आयुक्त कार्यालयाकडून परिपत्रक जारी

प्रधानमंत्री यशस्वी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन;जिल्ह्यातील 31 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र

vishwatmaklokswamivarta

अड. देसाई क्रिडांगणात कै. महेश मोरे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंट संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेत लखपती दीदी सन्मान सोहळा

आपत्ती व्यवस्थापनासाठी 300 आपदा मित्रांची प्रशिक्षणासाठी निवड होणार-> इच्छुक युवकयुवतींना नाव नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta