vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

१६ डिसेंबर १९७१ च्या ऐतिहासिक विजयाची आठवण आजही प्रत्येक देशवासीयाच्या मनात आहे ,यानिमीत्ताने दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकारवर विजय दिवसाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सहभागी

१६ डिसेंबर १९७१ च्या ऐतिहासिक विजयाची आठवण आजही प्रत्येक देशवासीयाच्या मनात आहेयानिमीत्ताने दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकारवर विजय दिवसाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सहभागी झाले होते.

नवी दिल्ली प्रतिनिधी ;१६ डिसेंबर १९७१ च्या ऐतिहासिक विजयाची आठवण आजही प्रत्येक देशवासीयाच्या मनात आहे. देशभरात हा दिवस विजय दिवस  म्हणून साजरा केला जातो. या ऐतिहासिक युद्धात भारताने पाकिस्तानला  गुडघे टेकायला भाग पाडलं होतं. यानिमीत्ताने दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकारवर विजय दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सहभागी झाले होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण केला. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी प्रज्वलित केलेल्या या चार मशाली सियाचीन ते कन्याकुमारी, अंदमान- निकोबार ते लोंगेवाला, कच्छचे रण आणि आगरतळापर्यंत फिरवण्यात आल्या होत्या.

भारताला १९६२ च्या युद्धातील मानहानिकारक पराभवातून बाहेर पडलेल्या १९७१ च्या बांगलादेश युद्धाने सक्षम नेतृत्व आणि तितकेच कार्यक्षम लष्कर म्हणून जगासमोर आणले. आपल्या गुप्तचर यंत्रणेची कार्यक्षमताही सिद्ध करून दाखवली. मानहानिकारक पराभवानंतर एखाद्या देशाने नवनिर्मितीत सहभाग देऊन विजयश्री खेचून आणण्याचे महत्कार्य करून दाखवणे, ही भारतासाठी दुर्मीळच घटना म्हटली पाहिजे. भारताने पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान अशा दोन आघाड्यांवर १९७१ च्या हिवाळ्यात युद्धात उडी घेऊन ही अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण कामगिरी करून दाखवली.

संबंधित पोस्ट

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी इच्छूक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

धर्मवीर चित्रपटामुळे सामान्य माणसाची संघर्ष गाथा प्रेक्षकांसमोर आली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

हरवलेल्या  व्यक्तीच्या शोध साठी धारावी पोलिसासह पालकाचे आव्हान.

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावी शाहूनगर पुन्हा चर्चेत..विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन वर्गात केले अश्लील कृत्य, गुन्हा दाखल…

vishwatmaklokswamivarta

आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका बीडच्या मनोज चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर महा विकास आघाडी सरकारविरुद्ध राजभवन संघर्ष, मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र…

vishwatmaklokswamivarta