vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र एसटीच्या संपाने खासगी ट्रॅव्हल्स ‘गब्बर’ नागरिकांची उडाली तारांबळ कधी सुटणार प्रश्न?

महाराष्ट्र एसटीच्या संपाने खासगी ट्रॅव्हल्स ‘गब्बर’ नागरिकांची उडाली तारांबळ कधी सुटणार प्रश्न?

 

नागपूर प्रतिनिधी: परवडणारे भाडे असणाऱ्या एसटीची संपामुळे  चाके थांबली. याचा गैरफायदा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी घेतला. मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लुट सुरू केली. जवळपास गेल्या दीड महिन्यांपासून प्रवाशी नाईलाजाने खासगी ट्रॅव्हल्सच्या तावडीत आहेत. भाड्याच्या दराचा बॅनर चक्क बसवर लावला आहे. संपामुळे सामान्य नागरिकांना खासगी बसने प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही.

 

दुपारी ३ वाजताची वेळ, गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकासोरील रस्त्यावरच ट्रॅव्हल्स उभ्या. भाड्याच्या मोठा बॅनर त्यांनी ट्रॅव्हल्सवर लावला. ‘लवकर बसा, नाहीतर बस निघून जाईल’ असे सुनावत ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांना वाहनात कोंबतात. एसटी नसल्याने नागरिकांना ही मनमानी निमुटपणे सहन केल्याशिवाय पर्याय नाही. बाहेरगावला जाणाऱ्या आजीबाई असो किंवा कुटुंब ट्रॅव्हल्स चालकांचे भाडे ऐकूण जरा ‘हबकून’च जात होते.मात्र, नाईलाज असल्याने त्यांना ट्रॅव्हल्सच्या पायऱ्या चढाव्याच लागत होत्या. गरिब असणाऱ्या प्रवाशांचे ट्रॅव्हल्सवाल्यांना त्याचे काही देणे-घेणे नाही. त्यांची उर्मट भाषा प्रवाशांचा आणखी संताप वाढवित होती

संबंधित पोस्ट

पोसरे येथे दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करतांना,स्लग-दलितांच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजनेंचा आरोप.

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास विभाग:अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणारआता जात प्रमाणपत्रांचे समितीमार्फत पुनर्विलोकन करता येईल..

आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क रहावे- मुख्य सचिव सुजाता सौनिक,मदतीबातची माहिती समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मिडिया व वृत्तपत्रांत ठळकपणे द्यावी शासन-प्रशासन आपदग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा विश्वास द्यावा

संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी वाढली, जामीनावर 14 दिवसांनी पुन्हा सुनावणी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचा  संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची झोप उडाली ,औरंगाबादेत दक्षिण अफ्रिकेसह विदेशातून 46 जण आले, 21 जण निगेटिव्ह….

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 500 अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन…