vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सातारा शहरातील रामदास स्वामींचे छत्रपती शिवाजी महाराज समवेत  चे शिल्प हटविण्याची मागणी….

सातारा शहरातील रामदास स्वामींचे छत्रपती शिवाजी महाराज समवेत  चे शिल्प हटविण्याची मागणी….

सातारा प्रतिनिधी: शहरातील राजवाडा बस स्थानकामधील छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत असणारे रामदास स्वामींचे वादग्रस्त शिल्प कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसताना उभारले. प्रशासनाने एक महिन्याच्या मुदतीत शिल्प न काढल्यास आम्ही हटवू, असा इशारा ज्येष्ठ इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

 

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी पूरोगामी संघटनांनी जिल्हा प्रशासनाला निवेदने देऊनही अनधिकृत शिल्पांची उभारणी करत उद्घाटनही झाले. याचा अर्थ पोलिस प्रशासनाची या प्रकरणाला मूकसंमती आहे काय? असा प्रश्‍नही कोकाटे यांनी उपस्थित केला. येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत कोकाटे बोलत होते. यावेळी पार्थ पोळके, अमर गायकवाड, अरबाझ शेख उपस्थित होते. श्री. कोकाटे म्हणाले, ‘‘राजवाडा बस स्थानकात शिल्प उभारून मिलिंद एकबोटे व विजय काटवटे यांनी कुठल्या आधारे उद्घाटन केले.

या देशात भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने खोटा इतिहास बहुजनांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जातीत संघर्ष लावणाऱ्यांवर कडक करवाई होण्याची गरज आहे. सहा महिन्यांपूर्वी शिल्प उभारण्याचा विषय पुढे आल्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, बांधकाम भवन व एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. मात्र, महाराष्ट्राच्या अस्मितेच्‍या प्रश्‍‍नावर या विभागाने दुर्लक्ष केले.’’ पोळके म्हणाले,‘‘भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीय दंगली घडविण्याचा हेतू आहे. शिवरायांचा खरा इतिहास पुसण्याचा प्रकार भाजप करत आहे. यासारखे प्रकार राज्यात वारंवार घडत असल्याने जनतेने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.’’

निमंत्रणपत्रिकेकडे दुर्लक्षछत्रपती शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरू असल्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतानाही शिल्प उभारणे हे भावना दुखविण्याचा प्रकार आहे. राजवाडा बस स्थानकात हे अनधिकृत शिल्प उभारून त्याच्या उद्घाटनाची निमंत्रणपत्रिका चार दिवस सोशल मीडियात फिरूनही या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे, पोलिसांनी बघ्याची भूमिका का घेतली? असा प्रश्‍न कोकाटे यांनी उपस्थित केला

संबंधित पोस्ट

राज्यातील रखडलेल्या विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी,खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

राज्या सरकारचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 6 जणांची मंत्रिमंडळ उपसमिती

vishwatmaklokswamivarta

लातूर येथे राज्यस्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धेचे उदगीरमध्ये शानदार उद्घाटन..

vishwatmaklokswamivarta

आचारसंहिता भंगाच्‍या तक्रारींसाठी-सी-व्हिजील ॲप आणि 1950 टोल फ्रि क्रमांक उपलब्ध..  

vishwatmaklokswamivarta

इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १९४ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण

vishwatmaklokswamivarta